Bigg Boss फेम अभिनेत्रीवर ओढावली भयानक परिस्थिती, ‘त्या’ प्रसंगाबद्दल म्हणाली…

Bigg Boss | 'त्या' धक्कादायक प्रसंगानंतर अभिनेत्रीची झाली होती भयानक अवस्था... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्री सांगितलं सत्य... सध्या सर्वत्र 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची चर्चा...

Bigg Boss फेम अभिनेत्रीवर ओढावली भयानक परिस्थिती, त्या प्रसंगाबद्दल म्हणाली...
| Updated on: Sep 05, 2023 | 10:24 AM

मुंबई : 5 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांना येत असलेल्या चांगल्या – वाईट अनुभवांबद्दल सांगत असतात. आता देखील ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ज्या अभिनेत्रीने तिला आलेल्या वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री जास्मिन भसीन आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जास्मिन हिने स्वतःला मिळत असलेल्या धमक्यांबद्दल सांगितलं आहे. ऑनलाईन मिळत असलेल्या धमक्यांबद्दल अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

जास्मिन म्हणाली, ‘अन्य स्पर्धकाकडून मला सतत धमक्या येत होत्या. मला कळत नाही एखाद्याला एवढं प्रेम मिळतं आणि एखाद्याचा एवढा तिरस्कार केला जातो. तुमच्याकडे जे असतं तेच तुम्ही देवू शकता. तुमच्यामध्ये प्रेम असले तर, तुम्ही प्रत्येकाला प्रेम देवू शकता. तुम्ही एखाद्याचा तिरस्कार करत असला तर, तुमच्यात फक्त तिरस्काराच्या भावना आहेत…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्यावर अनेकांचा राग होता. ज्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेली होती. बलात्काराच्या धमक्या पाठवणार ऑनलाईल ट्रोलर होता. त्याची स्वतःची ओळख नव्हती. तेव्हा मला काहीही कळत नव्हतं. येत असलेल्या धमक्यांमुळे मी पहिल्यांदा उदास झाली होती. पण नंतर मला कळलं की या लोकांकडे मला बलात्काराच्या धमक्या पाठवायला आणि माझ्यावर गैरवर्तन करण्याची कोणतीही ओळख नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

जास्मिन अभिनेता अली गोनी याला करत आहे डेट

जास्मिन हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 14’ दरम्यान जास्मिन आणि अली गोनी यांच्यातील प्रेम बहरलं. दोघांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला आहे. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघे एकत्र देखील दिसतात. सोशल मीडियावर देखील एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत जास्मिन आणि अली प्रेम व्यक्त करताना दिसतात.


जास्मिन टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जास्मिन कायम तिच्या खोडकर स्वभावामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, जास्मिन तिच्या सौंदर्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. जास्मिन हिने ‘दिल से दिल तक’, ‘नागिन’, ‘दिल तो हॅप्पी है जी’, ‘जब वी मॅच्ड’ यांसारख्या सुपरहीट मालिकांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.