Raqesh Bapat: घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलला राकेश, ‘डिवोर्सनंतर केलेली पार्टी आणि…’

Raqesh Bapat: लग्नाला कंटाळलेल्या राकेश बापट याने डिवोर्सनंतर केलेली पार्टी... घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच अभिनेता झाला व्यक्त, पूर्व पत्नीबद्दल म्हणाला..., सध्या सर्वत्र राकेश बापट याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Raqesh Bapat: घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलला राकेश, डिवोर्सनंतर केलेली पार्टी आणि...
Raqesh Bapat
| Updated on: May 01, 2026 | 7:36 AM

Raqesh Bapat: अभिनेता राकेश बापट याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एवढंच नाही तर, ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 चा फर्स्ट रनरअप ठरला. ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्याने अनेकदा स्वतःच्या खासगी आयुष्यावर देखील मोठं वक्तव्य केलं. राकेश याने अभिनेत्री रिद्धी डोगरा हिच्यासोबत लग्न केलं. जवळपास 8 वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पण दोघांचा घटस्फोट होण्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दल कोणाला माहिती नव्हतं. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं.

रिद्धी डोगरा हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘मी आणि रिद्धी कायम चांगले मित्र होतो आणि आहोत. मी माझ्या बेस्टफ्रेंडसोबत लग्न केलं आणि आम्ही 8 वर्ष एकत्र राहिलो. आयुष्य खूप सुंदर आहे आणि यामध्ये अनेक चढ – उतार येतात आणि आपण एकमेकांपासून दुरावले जातो… तुम्ही प्रत्येक वेळी सगळ्यांसोबत जुळवून घेऊ शकत नाही. कधी विचार वेगळे होतात. तेव्हाच आम्ही ठरवलं की, मैत्री अधिक महत्त्वाची आहे … त्यामुळे वेळेत निर्णय घेणं योग्य ठरेल…

‘तुझ्या आयुष्यात कोणीतरी खास असलं पाहिजे आणि माझ्या देखील आयुष्यात कोणी खास असावं अशी माझी इच्छा आहे… दोघांचे विचार सारखे होते. दोन व्यक्ती मोकळेपणाने आपलं विचार मांडू शकतात. याचा मला आनंद आहे…’ यावेळी राकेश याने घटस्फोटाचं कारण देखील सांगितलं.

अभिनेता म्हणाला, ‘आम्ही कधीच एकमेकांना ब्लेम केलं आहे.. तू असं केलंस म्हणून लग्न मोडलं… लग्न दोन माणसं करतात आणि त्याचं पटतं म्हणून करतात. तुमची मुलं असतील तर तो ग्राफ वेगळा असतो… पण आमच्यात तो ग्राफ कधीच नव्हता… आम्ही आमच्या करियरमध्ये खूप व्यस्त होतो… लग्न झालं तेव्हा आमचं करियर पिकवर होतं. आम्ही दोघे एकटे मुंबईत राहत होते. कुटुंब आमच्यासोबत नव्हतं. त्यामुळे मुलांना कोण वाढवणार? नाहीतर करियर सोडून आम्हाला घरी बसावं लागलं असतं. नॅनी ठेवणं आम्हाला पटत नव्हतं… त्यामुळे आम्ही कधी तसा विचारच नाही केला.’

‘आमचा डिवोर्स झाला तेव्हा आम्हाला खूप चांगलं वाटलं… आम्ही वांद्रे कोर्टात गेलो तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की आमचा डिवोर्स झाला आहे. घरी आल्यानंतर आम्ही पार्टी केली. आमच्या डिवोर्सची पार्टी झालेली.’ रिद्धीबद्दल राकेश म्हणाला, ‘ती माझी आयुष्यभर बेस्टफ्रेंड राहणार आहे. आम्ही दोघे एकमेकांचा खूप आदर करतो… काही नात्याला कोणतं नाव नसलेलंच बरं असतं…’ असं देखील अभिनेता राकेश बापट म्हणाला.

Follow Us