AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आणखी एका नेत्याने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 3:19 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं.  मात्र त्यानंतर हे यश त्यांना टिकवून ठेवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीच्या निकालापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंद गट आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विभाग समन्वयक बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे, त्यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश  झाला आहे.  या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला ठाण्यात मोठं खिंडार पडलं आहे. तसेच आता महाविकास आघाडीमध्येच फोडा-फोडीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, बिपीन गेहलोत यांचा आज पक्ष प्रवेश झाला आहे.  आज स्वातंत्र्य दिन आहे, आजच्या दिवशी भारत स्वातंत्र झाला. मात्र गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्यामुळे मन दुखावलं गेलंय.  सरन्यायाधीश भूषण गवई यांना एका व्यक्तीने चप्पल मारली कारण ते दलित आहेत. खरगे यांच्या भाषणानंतर ती जागा गंगाजल टाकून पवित्र करण्यात आली, कारण ते दलित आहेत आणि आपण म्हणतो भारत स्वातंत्र्य झाला आहे. आपल्याला गांधी आणि नेहरूंनी स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेबांनी संविधान देऊन समानता दिली, पण संविधान मिटवणारे आता पैदा झाले आहेत. जातीयवाद्यांची मानसिकता कधीच बदलू शकत नाही,  ही लढाई या मानसिकतेच्या विरोधात आहे,  ही लढाई मनुवादाच्या विरोधात आहे, मरू पण मनुवाद्यांचा विरोध करत राहू, असं यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप