
Bigg Boss Hindi Season 19 Grand Premiere Live Coverage Updates in Marathi : ‘बिग बॉस सीजन 19’ची चाहते मागील काही दिवसांपासून सतत वाढ पाहत होते. शेवटी आज बिग बॉस सीजन 19 चा ग्रॅंड प्रिमियर आहे. सलमान खान या सीजनला धडाक्यात सुरूवात करणार आहे. बिग बॉसच्या घरात नेमके कोण सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सलमान खानचा यंदा शोमध्ये कसा लूक असणार हे पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. काही जगप्रसिद्ध व्यक्तीमहत्व देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार आहेत. यंदाचे सीजन हीट करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. बिग बॉस 19 संदर्भातील प्रत्येक अपडेट आपल्याला इथे मिळेल.
पहिल्यांच दिवशी एकमेकांच्या चुगल्या करताना घरातील काही स्पर्धेक दिले आहेत.
बिग बॉसच्या घरात अमन मलिक हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे त्याचे अत्यंत धमाकेदार पद्धतीने घरात आगमन झाले आहे.
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका या बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या आहेत. सलमान खान याने अभिनेत्रीची ओळख करून देत काही खुलासे केले आहेत.कुनिका यांना 20 ते 25 वयोगटातील मुले मेसेज करत असल्याचा खुलासा सलमान खानने केला.
भोजपुरी अभिनेत्री निलम बिग बॉसच्या घरात दाखल झालीये. यावेळी तिने खास डान्स करत प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले आहे.
बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे दाखल झाला आहे. हा मराठी कॉमेडियन आहे, त्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
बिग बॉसच्या घरात अभिनेता गाैरव खन्ना याचे धमाकेदार आगमन झाले आहे. खास डान्स करताना गाैरव खन्ना हा दिसला आहे. अनुपमा मालिकेत तो धमाकेदार अभिनय करताना दिसला.
अभिषेक बजाज हा नुकताच बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. यावेळी सलमान खान घरातील सदस्यांसोबत गप्पा मारताना दिसला आहे.
नगमा मिराजकर आणि आवेज दरबार सलमान खानच्या घरात प्रवेश करणार आहेत. दोघे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहेत.
बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या तान्या मित्तलला सलमान खान याने चांदीची बॉटल गिफ्ट म्हणून दिली आहे.
सलमान खान याने प्रेमाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला असून म्हणाला की, खरे प्रेम कधी झाले नाही अजून.
तान्या मित्तल ही बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. अत्यंत खास लूकमध्ये ती बिग बॉसच्या स्टेजवर पोहोचली आहे.
सलमान खानच्या शोमध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. झीशान कादरी बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.
अशनूर कौर ही बिग बॉस 19 च्या घरात येणारी पहिली स्पर्धेक आहे. विशेष म्हणजे तिने बिग बॉसच्या घरात खास प्रवेश केला. सलमान खानने तिचे चांगलेच काैतुक केले.
बिग बॉस 19 मध्ये निर्मात्यांनी काही नियम बदलली आहेत. यंदा घरातील सदस्यांचेच सरकार असणार आहे आणि त्यांना त्यांच्या समस्याा सोडवाव्या लागणार आहेत.
Bigg Boss 19 Grand Premiere: Fans ka Faisla – Mridul Tiwari vs Shehbaz Badeshapic.twitter.com/QVSgL8fRzE
— BBTak (@BiggBoss_Tak) August 23, 2025
सलमान खान हा बिग बॉसच्या घरात गेला असून बिग बॉस सीजन 19 च्या घराची झलक दाखवण्यात आली आहे. यंदा अत्यंत आलिशान बिग बॉसचे घर आहे.
यंदाचे सीजन अधिक खास असणार आहे. बिग बॉसच्या घरात घरातील सदस्यांचीच सरकार असणार असल्याचे बिग बॉसने सलमान खानला सांगितले.
बिग बॉसच्या घरात सलमान खान याची धमाकेदार एंट्री झाली आहे. सलमान खान अत्यंत खास लूकमध्ये दिसत आहेत. सलमाननंतर एक एक स्पर्धेक बिग बॉसच्या घरात दाखल होतील.
बिग बॉस 19 च्या घरात तान्या मित्तलची एंट्री झाली आहे. मागील काही दिवसांपासून ती बिग बॉसच्या घरात येणार की, नाही यावरून विविध चर्चा या रंगताना दिसलया होत्या.
बिग बॉस 19 चे सीजन सुरू होण्यास आता अवघे 20 मिनिटे राहिली असून अगदी थोड्याच वेळात धमाका होणार आहे.
ओटीटीवर बिग बॉस 19 चा प्रीमियर रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. 10.30 वाजता टीव्हीवर आपल्याला हा प्रीमियर बघता येणार आहे.
बिग बॉसच्या मंचावरून मागिन 7 मालिकेचा फर्स्ट लूक रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे
अर्जुन बिजलानीच्या एका व्हिडिओमुळे तो बिग बॉसमध्ये प्रवेश करणार की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली. व्हिडिओ स्पष्ट करत म्हटले की, मी मागच्या व्हिडिओमध्ये जे काही बोललो ते माझे मत होते.
गौरव खन्नाचे चाहते एक्सवर जास्तच सक्रिय दिसत आहेत. बिग बॉस 19 ला सुरूवात झाली नसतानाच एक्सवर गौरव की सरकार असे अनेक हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.
फॅन्स क्लबने गायक अमाल मलिक याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. गायकाचा चेहरा दिसत नाहीये पण तोच असल्याचे स्पष्ट होतंय. कौन तुझे यूं प्यार करेगा हे गाणे गाताना तो दिसतोय.
“Some contestants are playing with brains, some with heart ❤️ #BiggBoss19”#BB19JioHotstar pic.twitter.com/4iTUdsFAdt
— rakhi (@rakhi2441337794) August 24, 2025
सलमान खानच्या बिग बॉस 19 चे अनेक प्रोमोही आले आहेत. खास आणि धमाकेदार अशी डान्स बघायला मिळत आहेत.
Desi chhori aur videshi gori, aa rahe hai karne aapka dil chori! 😍💓
Dekhiye #BiggBoss19 ka Grand Premiere, aaj raat 10:30 baje, sirf #Colors aur @JioHotstar par.#Vaseline #AppyFizz @danubeprop @CitroenIndia #BB #BiggBoss #BB19 #BiggBoss19 pic.twitter.com/wvZpjuNq60
— ColorsTV (@ColorsTV) August 24, 2025
निर्मात्यांनी बिग बॉस 19 च्या ग्रँड प्रीमियरसाठी एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन स्पर्धकांबद्दल माहिती देण्यात आली आहे.
बिग बॉस 19 च्या पहिल्या एपिसोडला रात्री 10.30 ला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी जियो हॉटस्टारवरही आपण 9 वाजता शो बघू शकता.
कलर्स टीव्हीवर बिग बॉस 19 च्या घराची एक खास झलक आपल्याला रात्री 10.30 वाजता बघायला मिळेल. शिवाय यंदाच्या सीजनला नेमके कोण कोण सहभागी होणार हे देखील स्पष्ट होईल.
गाैरव खन्ना हे प्रसिद्ध अभिनेते असून ते बिग बॉस 19 च्या घरात सहभागी होणार हे स्पष्ट आहे. गाैरव खन्ना काय धमाका बिग बॉसच्या घरात करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
बिग बॉस 19 चा प्रीमियर रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर सुरू होईल. कलर्स टीव्हीवर रात्री 10:30वाजता प्रसारित होईल.
बिग बॉस सीजन 19 पाच महिने चालणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. दरवेळी सीजन 3 महिन्यांचे असते. मात्र, यंदा पाच महिने चालणार असल्याची चर्चा रंगताना दिसतंय.
नेहमीप्रमाणे सलमान खान हा बिग बॉस 19 ला होस्ट करताना दिसणार आहे.