
बिग बस मराठी सिझन 5चा विजेचा सूरज चव्हाण काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकला. पुण्यातील सासवड येथे मोठ्या थाटामाटात सूरजचा लग्न सोहळा पार पडला. सूरजने मामाची मुलगी संजनाशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाला लाखो चाहत्यांनी हजेरी लावली. सूरजची बिग बॉसच्या घरातील बहिण जान्हवी किल्लेकर सोडली तर इतर कोणताही सेलिब्रिटी या लग्नाला दिसला नाही. आता सूरजचा बिग बॉसच्या घरातील सहकारी छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडेने लग्नला न येण्यामागचे कारण सांगितले आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र त्याला चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
बिग बॉसच्या घरात असताना सूरज चव्हाण आणि घन:श्याम दरोडे यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. पण सूरजच्या लग्नाला मात्र छोटा पुढारी गैरहजर राहिला. आता घन:श्यामने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लग्नाला न येण्याबद्दल सांगितले आहे. मात्र, ते पाहून नेटकऱ्यांनी घन:श्यामला चांगलेच सुनावले आहे. काही नियोजित कार्यक्रम आणि एका वृत्तवाहिनीसोबत केलेल्या करारामुळं कुठंही जाता येत नाहीये, त्यामुळं सूरजच्या लग्नाला जाता आलं नाही. लग्नाच्या दिवशी मी अमरावतीमध्ये होते. त्यामुळे लग्नाला आलो नाही असे छोटा पुढारी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
घन:श्यामचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत छोटा पुढारीला सुनावले आहे. एका यूजरने कमेंट करत, बरं झालं नाही गेलास चेंगरला असता अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, खोट्ट बोलायचं नाही सूरज च लग्न झालंय म्हणून जळतोस त्याच्यावर घनश्या असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने तर खरं सांग घनश्या गाडी नव्हती ना जायला अशी कमेंट केली आहे.
Chota Pudhari troll
सूरजच्या लग्नाविषयी
बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण हा सतत चर्चेत राहिला आहे. टिकटॉकवरील रिल्सने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर सूरज हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये सहभागी झाला होता. अतिशय साध्या भोळ्या स्वभावाचा, गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने स्वत:च्या खेळाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने बिग बॉसचा ताज स्वत:च्या नावे केला. आता सूरजने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली असून त्य़ाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.