AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्या पुढारीने ठणकावले, धनश्याम दरोडे बिग बॉसच्या घरात थेट म्हणाला, आवाज खाली…

बिग बॉस मराठी 5 सध्या तूफान चर्चेत दिसत आहे. विशेष म्हणजे हे सीजन धमाका करत आहे. या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या सीजनमध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले आहेत.

छोट्या पुढारीने ठणकावले, धनश्याम दरोडे बिग बॉसच्या घरात थेट म्हणाला, आवाज खाली...
Ghanshyam Darode
| Updated on: Aug 18, 2024 | 1:34 PM
Share

बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन झालाय. खास एक टास्क बिग बॉसने घरातील सदस्यांना दिला. यामध्ये दोन टीम नेहमीप्रमाणे घरात बघायला मिळाल्या. नेहमीप्रमाणे बिग बॉसने निकी तांबोळी हिचा क्लास लावल्याचे बघायला मिळाले. निकी तांबोळी हिने अरबाज पटेल हा कॅप्टन झाल्यानंतर म्हटले होते की, मी आता सर्व ऐकणार आहे, कारण माझा मित्र कॅप्टन झालाय. हेच नाही तर मागील आठवड्यामध्ये मोठी भांडणेही निकी तांबोळी हिने केली आहेत.

आता बिग बॉसच्या घरात वेगळेच एक समीकरण बघायला मिळतंय. छोटा पुढारी अर्थात सर्वांचा आवडता धनश्याम दरोडे हा निकी तांबोळी हिच्या खूप जवळ येताना दिसतोय. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात जास्त वेळ निकी तांबोळी आणि घनश्याम हे एकत्र बसल्याचे बघायला मिळतंय. मात्र, अगोदर निकी तांबोळी आणि घनश्याम यांनी स्पष्ट केले की, आम्ही बहिण भाऊ आहेत.

घरातील जास्त करून सदस्यांना निकी तांबोळी आणि छोट्या पुढारीची मैत्री ही आवडताना दिसत नाहीये. दुसरीकडे टास्कवेळी घरातील काही सदस्य हे छोट्या पुढारीला रागात बोलताना दिसले. हेच नाही तर त्याच्यावर ओरडण्यात देखील आले. यानंतर छोट्या पुढारीने थेट म्हटले की, आवाज कमी करून बोलायचे…

माझ्यासोबत बोलायचे तर आवाज कमीच ठेवायचा असे थेट घरातील सदस्यांना ठणकावताना छोटा पुढारी हा दिसला. विशेष म्हणजे कॅप्टनशी टास्कमध्ये धमाकेदार गेम खेळतानाही छोटा पुढारी दिसला. निकी तांबोळी याच्यासोबतची छोट्या पुढारीची वाढलेली मैत्री अनेकांना पटत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच एका टास्कनंतर छोट्या पुढारीला किस देताना निकी तांबोळी ही दिसली होती. यावेळी निकी तांबोळी हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते की, हा घनश्याम माझ्या लहान भावासारखा आहे. घनश्याम आणि निकी तांबोळी यांचे अनेक फोटो देखील त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. मराठी बिग बॉसच्या अगोदर निकी तांबोळी ही हिंदी बिग बॉसमध्येही धमाका करताना दिसली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...