निकी तांबोळी हिने केला सूरज चव्हाण याच्याजवळ हैराण करणारा खुलासा, म्हणाली, अरबाज पटेल याच्या….

Nikki Tambolia and Arbaaz Patel : बिग बॉस मराठी सीजन 5 च्या फिनालेसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. विशेष म्हणजे हे सीजन धमाका करताना दिसत आहे. प्रेक्षकांमध्येही या सीजनबद्दल एक मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. आता नुकताच निकी तांबोळी हिने मोठा खुलासा केलाय.

निकी तांबोळी हिने केला सूरज चव्हाण याच्याजवळ हैराण करणारा खुलासा, म्हणाली, अरबाज पटेल याच्या....
Nikki Tamboli
| Updated on: Sep 30, 2024 | 1:27 PM

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. या सीजनच्या फिनालेला आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले 6 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. यंदा बिग बॉसच्या निर्मात्यांनी मोठे बदल केले असून सीजनचे काही दिवस कमी केले आहेत. आता लवकरच बिग बॉसच्या घरात फिनाले वीक सुरू होईल. विशेष म्हणजे घरातील स्पर्धेक धमाका करताना दिसत आहेत. घरातील सदस्यांचे कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. त्यानंतर काही काळ घरातील वातावरण हे चांगलेच बदलल्याचे बघायला मिळाले.

निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांचे एक वेगळेच नाते बिग बॉसच्या घरात बघायला मिळावे. अरबाज प्रत्येक गोष्ट निकीची ऐकताना दिसला. कितीही वाद झाले तरीही थोड्याच वेळात दोघे एकमेकांना बोलताना दिसले. काही दिवसांपूर्वीच अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलाय. अरबाज घरातून बाहेर पडत असताना ढसाढसा रडताना निकी तांबोळी ही दिसली.

निकी तांबोळी हिची आई तिला भेटण्यासाठी घरात आली होती. यावेळी निकी तांबोळीच्या आईने जो खुलासा केला, ते ऐकून निकी तांबोळीच्या पायाखालची जमिन सरकल्याचे बघायला मिळाले. निकी तांबोळीच्या आईने तिला स्पष्ट सांगितले की, अरबाज पटेल याचा बाहेर साखरपुडा झालाय. आईचे बोलणे ऐकून निकी तांबोळी हैराण झाली. आपल्याला अरबाज पटेल याने धोका दिल्याचेही तिने म्हटले.

हेच नाहीतर त्याने आपल्याला ही गोष्ट कधीच सांगितली नसल्याचेही सांगताना निकी तांबोळी दिसली. आता सूरज चव्हाण याच्यासोबत बोलत असताना निकी तांबोळीने मान्य केल की, आपल्याला अरबाज पटेल हा आवडत होता. तो माझ्यासाठी इतके घरात करायचा मला कधीच वाटले नव्हते की, तो फक्त आणि फक्त हा नाटक करत होता आणि धोका देत होता.

यावेळी सूरज चव्हाण याने परत एकदा निकी तांबोळी हिला विचारले की, तू काय खरच त्याच्या प्रेमात पडली होती का? यावर कबुली देताना निकी तांबोळी ही दिसली. मात्र, त्याने आपल्याला धोका दिल्याने त्याचा विषय संपल्याचेही निकीने म्हटले. यावेळी सूरज हा निकीला समजून सांगताना दिसला. तो त्याच्या गोड गोड गोष्टींमध्ये फसल्याचेही सूरज चव्हाण याने म्हटले आहे.