AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 डिसेंबर रोजी अमेरिकेतून होऊ शकते थेट मोठी घोषणा, त्या क्षणाकडे संपूर्ण जगाच्या नजरा, अखेर..

गेल्या चार वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. अमेरिकेकडून आता हे युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष आज अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान मोठी घोषणा होऊ शकते.

28 डिसेंबर रोजी अमेरिकेतून होऊ शकते थेट मोठी घोषणा, त्या क्षणाकडे संपूर्ण जगाच्या नजरा, अखेर..
russia ukraine war us
| Updated on: Dec 28, 2025 | 11:01 AM
Share

रशिया युकेन युद्ध गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सुरूवातीला ज्यावेळी हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी युद्ध जास्त काळ चालणार नाही, असा सर्वांचा अंदाज होता. युक्रेनच्या तुलनेत रशियाकडे मोठी लष्करी ताकद आहे. मात्र, अमेरिकेसह नाटो देश युक्रेनसाठी थेट मैदानात उतरले. अमेरिका युकेनला युद्धासाठी मदत करत असल्याचे जगजाहीर आहे. पुतिन यांनी नुकताच दावा करत म्हटले की, युक्रेनला शांतता मार्गाने हे युद्ध थांबवायचे नाही. अमेरिकेकडून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. एक शांतता प्रस्ताव देखील अमेरिकेने युक्रेन आणि रशियाला दिला. मात्र, या शांतता प्रस्तावाला युक्रेनने केराची टोपली दाखवली. रशियाकडून हा शांतता प्रस्ताव मंजूर असल्याचे सांगण्यात आले. युकेनचे अध्यक्ष अमेरिकेच्या दाैऱ्यावर असून या युद्धाच्या मुद्द्यामध्ये त्यांच्या या अमेरिकेच्या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या काळात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक नागरिक मारले गेले. अमेरिका आणि युरोपीय देश या दोन्ही देशांमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसत आहेत. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शांतता करार पुढे जाण्याच नाव घेत नाही.

या शांतता करारासंदर्भात रविवारी 28 डिसेंबर रोजी एका मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे. असे सांगितले जात आहे की, झेलेन्स्की अखेरीस शांतता कराराबाबत एक निर्णय घेऊ शकतात, जो युद्धाचा अंतिम परिणाम निश्चित करेल. पुतिन यांनी अगोदरच झेलेन्स्की यांच्यावर आरोप करत म्हटले की, झेलेन्स्की यांनाच हे युद्ध थांबवायचे नाही. पहिला प्रस्तावही त्यांनी धुडकून टाकला होता.

पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासमोर शांतता करारासाठीच्या अटी स्पष्टपणे मांडल्या होत्या. ज्यात त्यांनी म्हटले होते की, युद्धात ताब्यात घेतलेल्या युक्रेनियन प्रदेशांवरील नियंत्रण ते सोडणार नाहीत. मात्र, त्याकरिता युक्रेनही दावा करताना दिसत आहे. झेलेन्स्की सातत्याने आत्मसन्मानाची लढाई असल्याचे सांगत आहेत. मात्र, अमेरिकेकडून झेलेन्स्की यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. यामुळे झेलेन्स्की एक पाऊल मागे टाकण्याची शक्यता आहे. आजच अमेरिकेतून झेलेन्स्की युद्धाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.