अदानींच्या बारामती दौऱ्यावरून संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले अजित पवारांना फोडण्यामागे…
गौतम अदानी यांच्या बारामती दौऱ्यात रोहित पवारांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले, तर अजित पवार सोबत बसले होते. या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले असून, संजय राऊतांनी अदानींवर मुंबई ताब्यात घेण्याचा आरोप करत जोरदार टीका केली आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. बारामतीमध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम पार पडत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ (AI) चे उद्घाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. गौतम अदानी यांचे बारामतीत आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानी यांनी स्वत: कार चालवली. त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याच मुद्द्यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गौतम अदानींच्या बारामती दौऱ्याबद्दल भाष्य केले. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नाहीत. कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी अदानींना बोलवलं असेल. यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारही उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.
हे मुंबईसाठी आणि मराठीसाठी अत्यंत घातक
मुंबईवर ज्या पद्धतीने एक उद्योगपती ताबा मिळवतो तो मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र आहे. त्याच्यावर आमचा नैतिक विरोध आहे. आमची लढाई अदानी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे. हे सर्व ते भाजपच्या पद्धतीने मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. ते उद्योगपती आहेत. अनेक उद्योगपती आहेत. पण अदानी यांच्या पद्धतीने हव्यास इतर कोणत्याही उद्योगपतीने दाखवल्याचे मला तरी दिसलं नाही. ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जातंय हे मुंबईसाठी आणि मराठीसाठी अत्यंत घातक आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
आता खरं खोटं तेच सांगतील
शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नाहीत. कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी अदानींना बोलवलं असेल. यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारही उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पवारांचा पक्ष फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माहिती होती. अजित पवारांना पश्रातून फोडण्यास अदानी होते अशी माहिती मी वाचली आणि ऐकली आहे आता खरं खोटं तेच सांगतील, असेही सूचक विधान संजय राऊतांनी केले.
