शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ‘ते आयुष्याचं एक पान…’

Shamita Shetty on Breakup Raqesh Bapat: एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांच्या नावाची चर्चा होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. यावर शमिताने मोठं वक्तव्य देखील केलं होतं...

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान...
| Updated on: Apr 22, 2026 | 4:17 PM

Shamita Shetty on Breakup Raqesh Bapat: अभिनेता राकेश बापट याच्याबद्दल आता काही वेगळं सांगण्याची गरज नाही. राकेश बिग बॉस मराठीच्या 6 व्या पर्वाचा उपविजेता (Runner-up) ठरला आहे, तर, अभिनेता, तन्वी कोलते विजेती ठरली. याआधी देखील राकेश ‘बिग बॉस’मध्ये झळकला आहे. बिग बॉस ओटीटी सीजन 1 आणि ‘बिग बॉस हिंदी 15’ मध्ये देखील झळकला. तेव्हा अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी देखील झळकली होती. ‘बिग बॉस’च्या दोघांमध्ये लव्ह अँगल देखील पाहायला मिळाला. बिग बॉस संपल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअपनंतर खुद्द शमिता हिने त्यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.

ब्रेकअपनंतर एका मुलाखतीत शमिता शेट्टी हिने ब्रेकअपचं कारण सांगितलं होतं. ‘तुम्ही लोकं एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा तुम्ही कोणत्या घरात अनेक दिवसांसाठी बंद आहात, अशात अशा रिलेशनशिपमध्ये असणं फार सामान्य गोष्ट आहे… कारण त्याकाळात तुम्हाला एक सपोर्टची गरज असते… तेव्हा अशक्त वाटतं तेव्हा अशा नात्याची गरज भासते… जे प्रचंड सामान्य आहे.’

पुढे शमिता म्हणाली, ‘जेव्हा आम्ही घरातून बाहेर आलो तेव्हा आमचं नातं फार काळ टिकलं आहे… कारण आम्ही एकमेकांपासून प्रचंड वेगळे होतो… ते माझ्या आयुष्याचं एक पान होतं जे मी पुसून टाकलं गेलं. काळानुसार, जसजसे तुम्ही मोठे होता, तसतसे तुम्हाला कळतं की, काय योग्य आहे आणि काय नाही. तुम्हाला त्या बाबतीत अजिबात तडजोड करायची नसते. मी एक स्वावलंबी स्त्री आहे, त्यामुळे कोणत्याही एकटेपणामुळे मी माझ्या कामाशी तडजोड करणार नाही. मला वाटतं, जेव्हा लोकांना एकटेपणा जाणवतो, तेव्हाच ते नात्यांमध्ये गुंतण्याची शक्यता जास्त असते. मी आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे मला स्वतःला आनंदी कसं ठेवायचं हे माहीत आहे. पण यासाठी नक्कीच वेळ लागला. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सांगायचं झालं तर, शमिता आणि राकेश 2012 मध्ये बिग बॉस ओटीटीवर झळकले होते, जिथे ते एकमेकांच्या जवळ आले. नंतर, 2022 मध्ये, शमिता आणि राकेश यांनी एका पोस्टद्वारे त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली.

Follow Us