AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या वाघाने मोहीम फत्ते केली, ओमराजेंच्या शिंदे सेनेतील प्रवेशामागे नेमकं कोण? अखेर चेहरा समोर आला!

खुद्द आमदार तानाजी सावंत यांनीच ओमराजे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर भाष्य केले आहे. ओमराजांचे पहिले पाच वर्षे विरोधात गेले आणि दुसरी टर्म सुरू राहिली तरी परिस्थिती तशीच राहिली. ओमराजे यांच्यासोबत माझे अतिशय चांगले संबंध आहेत, असे तानाजी सावंत म्हणाले.

शिंदेंच्या वाघाने मोहीम फत्ते केली, ओमराजेंच्या शिंदे सेनेतील प्रवेशामागे नेमकं कोण? अखेर चेहरा समोर आला!
tanaji sawant and omraje nimbalkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2026 | 8:13 PM
Share

धाराशिव : ठाकरे यांच्या शिवसेनेत एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर खासदारांमधील ओमराजे निंबाळकर यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. मी अगोदर माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार. त्यानंतरच मी ठाकरे गटात कायम राहायचं की शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा हे ठरवणार आहे, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, ओमराजे यांच्या या भूमिकेनंतर एकच खळबळ उडाली असून शिंदे गट त्यांना पक्षात घेण्यासाठी सक्रीय झालेला होता. ठाकरे गटाकडूनही त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाने आमदार तानाजी सावंत यांच्यावर ओमराजे यांना पक्षात आणण्याची जबाबदारी सोपवली होती. आता ही जबाबदारी तानाजी सावंत यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचे समोर आले आहे. कारण ओमराजे निंबाळकर यांनी स्वत:च मी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, अशी घोषणा केली.

तानाजी सावंत यांचे समर्थक चांगलेच आक्रमक

आमदार तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्यावर ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली होती.   ओमराजे यांची बैठक सुरू असलेल्या ठिकाणापासून दीड किलोमीटर अंतरावर तानाजी सावंत यांचे समर्थक थांबलेले होते. तानाजी सावंत यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माणसांना जर कोण धमकी देत असेल आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, असे म्हणत ओमराजे यांच्या प्रवेशासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते सज्ज असलेले पाहायला मिळाले.

ओमराजे यांच्यासोबत माझे अतिशय चांगले संबंध

खुद्द आमदार तानाजी सावंत यांनीच ओमराजे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर भाष्य केले. ओमराजांचे पहिले पाच वर्षे विरोधात गेले आणि दुसरी टर्म सुरू राहिली तरी परिस्थिती तशीच राहिली. ओमराजे यांच्यासोबत माझे अतिशय चांगले संबंध आहेत. माझं कोणाशीही वाकडं नाही. या भागाचा विकास करायचा असेल तर आम्हाला एकत्र येऊन काम करावे लागेल. ओमराजेंचा प्रवेश होईल, असे सावंत म्हणाले होते. आता ओमराजे यांनी मी शिवसेनेत जाणार आहे, असे सांगितले आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन