AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! ओमराजेंचा अखेर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेत प्रवेश करणार, थेट भूमिका जाहीर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्यानं एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर संकटात सापडलं होतं, अखेर आता ओमराजे यांची अधिकृत भूमिका समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी! ओमराजेंचा अखेर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेत प्रवेश करणार, थेट भूमिका जाहीर
ओमराजे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 21, 2026 | 8:23 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, नऊ पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे.  हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे, परंतु त्यांनी  शनिवारी मोठं विधान केलं होतं, मी अजूनही पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं होतं, परंतु आता ओमराजे निंबाळकर यांची अधिकृत भूमिका समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर

आज मी धाराशिव मतदारसंघातील जीवाभावाच्या सर्व लोकांना विनंती केली होती की तुम्ही आज उपस्थित राहा. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकसभा कार्यक्षेत्रातील जीवाभावाची माणसं उपस्थित होती. सव्वाचार पासून सर्व हजर होती. आता ८ वाजत आले. सर्वांशी चर्चा केली. सर्वांचं मत जाणून घेतलं. सर्व मते जाणून घेतल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवाभावाच्या माणसांच्या सूचना आहेत. थोडी पार्शवभूमी सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्ते लढत असताना, धाराशिवमध्ये एकाही पंचायत समितीत, नगरपालिकेत आपल्याला यश मिळाले नाही.

सामान्य कार्यकर्ते चांगलं काम करणारे कार्यकर्ते वाईट पद्धतीने पराभूत झाले. मी असेन, सर्व सहकारी असेल २४ तास आम्ही सामान्य लोकांसाठी दिला. प्रामाणिक काम केलं. याचे साक्षीदार सर्वसामान्य माणसं आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, आमचा कार्यकर्ता कधी कामात कमी पडला नाही. समस्या सोडवण्यात कमी पडलो नाही. सत्तेमुळे आम्हाला यश मिळालं नाही. पराभवाला सामोरे जावं लागलं. सामान्य माणसाच्या कामासाठी आम्ही बसलो आहोत. सामान्य माणसाच्या ट्रान्सफार्मरलाही अडचणी येत होत्या. सर्वांच्या माध्यमातून निर्णय घेतला की आता शिवसेना पक्षात जाणार आहोत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार आहोत, अशी भूमिका यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केली आहे.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह