Bigg Boss Marathi 6: रुचितावर जडलाय विशालचा जीव, सर्वांसमोर प्रेमाची कबुली देत म्हणाला…, दोघांच्या वयात अंतर किती?

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉसच्या' घरात अखेर प्रेम बहरलं... विशाल याने सर्वांमो दिली रुचिता हिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली... किती आहे दोघांच्या वयात अंतर...?, व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल...

Bigg Boss Marathi 6: रुचितावर जडलाय विशालचा जीव, सर्वांसमोर प्रेमाची कबुली देत म्हणाला..., दोघांच्या वयात अंतर किती?
Bigg Boss Marathi 6
| Updated on: Feb 17, 2026 | 2:13 PM

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चं घर आणि लव्ह अँगल समोर येणार नाही असं होणं… अशक्य आहे. आता ‘ बिग बॉस मराठी 6 ‘मध्ये देखील दोन स्पर्धकांमध्ये प्रेम बहरलं आहे. रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील आता जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, रुचिता हिने आधीच विशाल याच्यासाठी मनात असलेल्या भावना अनुश्री हिच्याकडे व्यक्त केल्या होत्या… आता नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये विशाल याने देखील प्रेमाची कबुली दिली आहे. सांगायचं झालं तर, अनुश्रीला सांगताना रुचिता म्हणालेली, ‘मला विशाल याचा प्रेझेन्स आवडतो… पूर्ण घरातले लोक जेव्हा माझ्या चुकांबद्दल बोलत असतात तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर बोलतो. मी त्याच्याशी खूप अटॅच्ड आहे…खूप म्हणजे खूप!’, त्यानंतर अनुश्री सर्वकाही विशाल याला सांगते…

याावर विशाल म्हणतो, ‘आमच्यात 15 वर्षांचं अंतर आहे आणि एखादी व्यक्ती आपल्याला अशीच आवडू शकते… त्याचप्रमाणे रुचिता देखील मला आवडते…’ दरम्यान, नुकत्याच झालेल्या नॉमिनशन टास्क दरम्यान, विशाल, दिपाली हिला टॅग करतो आणि का नॉमिनेट केलं आहे, याचं कारण सांगतो… ‘रुतिता विशालचं ऐकते.. हो ती माझं ऐकते… आता मी सगळ्यांसमोर सांगतो मला रुचिता आवडते… ‘ यावर दिपाली म्हणते, ‘तुम्हाला अभिनंदन… पण बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर देखील नातं असंच असू द्या…’ त्यावर रुचिता म्हणते, ‘माझी आई – वडील आहे… ते बघून घेतील माझ्यासाठी काय ते… तुला बोलायची काहीही गरज नाही…’, आता बिग बॉसच्या घरात काय होणार पाहणं मजेदार असणार आहे..

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी 6 ‘ शोच्या घरामध्ये सर्वात आधी करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. अनेकदा दोघांना एकमेकांसाठी बाजू घेताना पाहण्यात आलं. एवढंच नाही तर, भाऊच्या धक्क्यावर दोघांना डान्स देखील करायला लावला. पण नुकाताच झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत करण याला बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला… त्यानंतर अनुश्री हिने टास्क दरम्यान, प्राजक्ता हिला नॉमिनेट केलं…

नॉमिनेट झाल्यानंतर प्राजक्त म्हणाली, ‘घरातील असलेल्या एक खास व्यक्ती बाहेर गेला आहे. ज्यामुळे मला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे एक दिवस तरी त्यातून बाहेर येण्यासाठी लागेल… आणि तो एक दिवस मी स्वतःला दिला आहे..’ असं देखील प्राजक्ता म्हणाली.