AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस मराठी’चा खास धमाका; रितेश देशमुखच्या प्रोमोची चर्चा

'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. रितेश देशमुखला पुन्हा एकदा पाहून नेटकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'बिग बॉस मराठी'चा खास धमाका; रितेश देशमुखच्या प्रोमोची चर्चा
Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 02, 2025 | 1:33 PM
Share

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. हा सिझन प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन केलं होतं आणि त्याचा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण यांसारख्या स्पर्धकांनी हा सिझन तुफान गाजवला होता. आता ‘बिग बॉस मराठी’चा नवीन प्रोमो नुकताच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये नव्या सिझनविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय, “ढोल-ताशाच्या गजरात सगळेच स्पर्धक बिग बॉसच्या चक्रव्यूहात शिरणार. जे चांगले वागणार, त्यांची मी वाह-वाह करणार, पण जे वाईट वागणार त्यांची मी.. सगळ्यांची वाजणार, हा सिझन गाजणार.” त्यामुळे बिग बॉस मराठीचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘कलर्स मराठी घेऊन येत आहे मनोरंजनाचा तडका, पुन्हा एकदा रितेश देशमुखसोबत होणार बिग बॉस मराठीचा खास धमाका,’ असं कॅप्शन देत हा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र कार्यक्रमाची वेळ पाहून काहींच्या मनात शंकाही उपस्थित झाली आहे.

‘बिग बॉस मराठी’ 10 फेब्रुवारीपासून दुपारी 3 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर.. असं या प्रोमोच्या अखेरीस पहायला मिळतं. त्यामुळे दुपारी जुन्या बिग बॉस मराठीचे एपिसोड्स पुन्हा प्रसारित करणार की काय, असा प्रश्न काहींना पडला आहे.  ‘नवीन सिझन की रिपिट टेलिकास्ट’ असा सवाल एकाने केला. तर ‘नवीन सिझन दुपारी 3 वाजता कसा काय सुरू होईल, रिपिट टेलिकास्ट असेल’, असा अंदाज दुसऱ्या युजरने वर्तवला आहे. ‘कोणता सिझन याचा तरी उल्लेख केला’, अशीही मागणी बिग बॉसच्या चाहत्यांनी केली आहे. त्यामुळे ही नेमकी भानगड काय आहे, हे येत्या काही दिवसांतच समजेल.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा