
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले पार पडलाय. रितेश देशमुख आपल्या खास स्टाईलमध्ये फिनालेला होस्ट करताना दिसलाय. 7o दिवसांनंतर बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा ही करण्यात आलीये. वोटिंग ट्रेंड देखील पुढे आले होते. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे पोहोचले. आता सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ चा विजेता ठरलाय. सूरजच्या नावाची घोषणा रितेश देशमुख याच्याकडून करण्यात आलाय. सूरज चव्हाण याच्यावर काैतुकांच्या वर्षाव केला जातोय.
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता ठरलाय. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून त्याला 14 लाख रूपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत.
सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला असून तरूणाईमध्ये सूरज चव्हाण याच्याबद्दल मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच बघायला मिळाली.
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा नुकताच करण्यात आलीये. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरलाय.
सूरज चव्हाण अखेर ठरला आहे बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता. रितेश देशमुख याने केले विजेत्याच्या नावाची घोषणा
निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 पर्यंत पोहोचली. आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर निकी तांबोळी ही पडली आहे. तिने अगोदरच मान्य केले होते की, ती टॉप 3 मधून बाहेर पडेल.
आता बिग बॉसच्या घरात टॉप 3 मध्ये सूरज चव्हाण, निकी तांबोळी आणि अभिजीत सावंत हे आहेत. या तिघांपैकी एकजण बिग बॉसचा विजेता होणार आहे. लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय.
बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले सुरू असून आलिया भट्ट ही बिग बॉस मराठी सीजन 5 च्या मंचावर पोहोचली आहे. जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट ही पोहोचली आहे.
पती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर धनंजय पोवारच्या पत्नीला आपले हुंदके अनावर झाले. धनंजयची पत्नी थेट बिग बॉसच्या घरात रडताना दिसली. यावेळी धनंजय पत्नीला समजून सांगताना देखील दिसला.
अभिजीत आणि सूरज चव्हाण हे टॉप 3 मध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय देखील त्यांच्यासोबत आहेत.
अरबाज पटेल याने बिग बॉस फिनालेमध्ये धमाकेदार असा डान्स केलाय. लोकांना अरबाजचा डान्स आवडलाय.
फिनालेला सुरूवात झाली असून अंकिता वालावलकर हिचा आता बिग बॉसच्या घरातील प्रवास संपवला आहे. निकी तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण हे टॉप 4 मध्ये पोहोचले आहेत.
बिग बॉसचा फिनाले सुरू असून घरात आता ज्योतिषीचे आगमन झाले असून निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 पर्यंत असू असते असे सांगण्यात आलंय. आता खरोखरच निकी तांबोळी ही टॉप 3 पर्यंत जाऊन शकते का..
बिग बॉसच्या फिनालेमध्ये वैभव आणि इरीनाने धमाकेदार डान्स केलाय. विशेष म्हणजे दोघांनीही अत्यंत रोमांटिक होत हा डान्स केलाय.
जान्हवी किल्लेकर हिचा आता बिग बॉसच्या घरातील प्रवास संपलाय. आता बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी आणि धनंजय पोवार हे आहेत.
फिनालेला सुरूवात झालीये. टॉप 6 स्पर्धकांमधून जो आता बाहेर पडेल त्याला नऊ लाखांची रक्कम मिळणार आहे. आता नऊ लाख रूपये घेऊन जान्हवी ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.
बिग बॉसच्या निर्मात्यांनी मोठी खेळी खेळल्याचे बघायला मिळतंय. टॉप 6 पैकी जो व्यकी आता बाहेर मनाने पडेल त्याला नऊ लाख रूपये मिळणार आहेत.
फिनालेमध्ये जान्हवी किल्लेकर आणि निकी तांबोळी यांनी केला आहे अत्यंत जबरदस्त डान्स. आज की रात्र गाण्यावर जान्हवी आणि निकीने डान्स केलाय.
नुकताच सलमान खान याने एक व्हिडीओ शेअर करत रितेश देशमुख याला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून सलमान खान याने शुभेच्छा दिल्या आहेत.
फिनालेमध्ये बिग बॉसच्या निर्मात्यांनी रितेश देशमुख याला अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे. निर्मात्यांकडून थेट रितेश देशमुख याचाच संपूर्ण प्रवास सीजनमधील दाखवण्यात आलाय.
काही व्हिडीओ दाखवत बिग बॉसच्या निर्मात्यांनी रितेश देशमुख याचे काैतुक केले. या व्हिडीओमध्ये लोक भाऊच्या धक्क्याबद्दल बोलताना देखील दिसले आहेत.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा आज फिनाले पार पडतोय. फिनालेसाठी आता सलमान खान हा देखील रितेशसोबत मंचावर पोहोचला आहे.
बिग बॉसच्या घरातील टॉप 6 फायनलिस्ट धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत.
दोन आठवडे आपण शोमध्ये का पोहचू शकलो नाही हे सांगताना रितेश देशमुख हा दिसलाय. रितेश म्हणाला की, माझे विदेशात शूटिंग सुरू असल्याने मला दोन आठवड्यांमध्ये येता आले नाही.
बिग बॉसच्या फिनालेला सुरूवात झालीये. स्पर्धकांचा प्रवास दाखवला जातोय.
रितेश देशमुख याने बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट केले असून त्याचे काैतुक चाहत्यांकडून केले जातंय.
6 वाजता बिग बॉस मराठी सीजन 5 च्या फिनालेला सुरूवात होणार आहे.
अभिजीत सावंत हाच बिग बॉस मराठीचा विजेता होणार असल्याचे सांगितले जातंय. त्यामध्ये आता प्रोमोमध्ये अभिजीत सावंत हा जबरदस्त लूकमध्ये दिसलाय.
बिग बॉसचे टॉप 6 फायनलिस्ट बिग बॉसच्या फिनालेमध्ये धमाल करताना दिसत आहेत.
फिनालेमध्ये जान्हवी आणि निकी तांबोळी यांच्या डान्सचा जलवा बघायला मिळेल.
बिग बॉस मराठी सीजन ५ चा आज फिनाले असून 70 दिवसांनंतर हा शो संपत आहे. 28 जुलैपासून बिग बॉस मराठीला सुरूवात झाली होती.
वोटिंग ट्रेंडमध्ये सूरज चव्हाण हाच धमाका करताना दिसतोय. तो सतत आघाडीवर असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यात टक्कर बघायला मिळतंय. मात्र, लोकांनी यावरून आता निर्मात्यांवर अनेक आरोप करण्यास सुरूवात केलीये.
अरबाज खान हा नुकताच बिग बॉसच्या घरात परत इतर सदस्यांसोबत आला. यावेळी त्याने निकी तांबोळी हिच्याजवळ काही मोठे खुलासे केले.
सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
बिग बॉस मराठीच्या वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता होईल तर अभिजीत सावंत हा उपविजेता होईल.
बिग बॉस मराठीचा Grand Finale 6 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर आपल्याला हा फिनाले पाहता येईल.
सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यामध्ये जोरदार टक्कर बघायला मिळतंय. सूरज आणि अभिजीतच बिग बॉसचे टॉप 2 फायनलिस्ट होणार असल्याची चर्चा आहे.
अंकिता वालावकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार
आज बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. अवघ्या काही तासांमध्येच फिनालेला सुरूवात होईल.