Abdu Rozik | ‘बिग बॉस OTT 2’च्या घरात अब्दू रोजिक याच्यासोबत बळजबरी, थेट घेतले किस आणि…

बिग बॉस OTT 2 हे गेल्या काही दिवसांपासुन चांगलेच चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे आकांक्षा पुरी हिच्या लिपलाॅकनंतर अनेकांनी थेट बिग बॉस OTT 2 च्या निर्मात्यांवर टिका केली. आता अजून एक मोठा प्रकार बिग बाॅसच्या घरात घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Abdu Rozik | बिग बॉस OTT 2च्या घरात अब्दू रोजिक याच्यासोबत बळजबरी, थेट घेतले किस आणि...
| Updated on: Jul 04, 2023 | 8:18 PM

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. घरातील सदस्य हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आकांक्षा पुरी (Akanksha Puri) हिने कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केल्याने मोठा वाद हा निर्माण झाला होता. अनेकांनी थेट बिग बाॅसच्या निर्मात्यांना खडेबोल सुनावले होते. महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही देखील बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झालीये. पूजा भट्ट बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss OTT 2) च्या घरात काही खुलासे तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल करताना सतत दिसत आहे. आकांक्षा पुरी ही नुकताच बिग बाॅसच्या (Bigg Boss) घराबाहेर पडली आहे.

बिग बाॅस 16 मध्ये धमाल करणार अब्दू रोजिक हा नुकताच बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात दाखल झाला आहे. मात्र, बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात अब्दू रोजिक याच्यासोबत एक असा प्रकार घडला आहे की, तो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकारावर राग व्यक्त करताना उर्फी जावेद ही देखील दिसली आहे.

बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात अब्दू रोजिक हा गाणे शूट करताना दिसला. मात्र, यावेळी मनीषा रानी हिच्यासोबत गाणे शूट करत असताना ती अब्दू रोजिक याच्याजवळ येतात दिसली. इतकेच नाही तर मनीषा रानी हिने अब्दू रोजिक याची बळजबरी किस देखील घेतली. आता याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

मनीषा रानी हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका ही केली जात आहे. मनीषा रानी हिने बळजबरी अब्दू रोजिक याची किस घेतल्याने उर्फी जावेद देखील संतापली आहे. यापूर्वीच आकांक्षा पुरी हिने घरात लिपलाॅक केल्याने सलमान खान याने तिला क्लास लावला होता. आता मनीषा रानी हिला सलमान खान काय बोलतो. याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

अब्दू रोजिक याची भारतामध्ये जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळत आहे. अब्दू रोजिक याने अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय. काही दिवसांपूर्वीच अब्दू रोजिक याने मुंबईमध्ये नवीन हाॅटेल सुरू केले आहे. अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय.