बिग बॉसच्या घरातील वाद टोकाला, साई केतन रावला करण्यात आला शिवीगाळ, भांडणांचा ‘तो’ व्हिडीओ…

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा धमाका होताना दिसत आहे. मोठा वाद घरात झालाय. हेच नाहीतर साई केतन राव याला थेट शिवीगाळ करण्यात आलीये. आईवर शिवी दिली असल्याने साई केतन राव हा थेट कटारिया याला मारण्यासाठी जाताना दिसत आहे. मात्र, यावेळी घरातील इतर सदस्य त्याला सांभाळतात.

बिग बॉसच्या घरातील वाद टोकाला, साई केतन रावला करण्यात आला शिवीगाळ, भांडणांचा तो व्हिडीओ...
bigg boss
| Updated on: Jul 17, 2024 | 12:15 PM

बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय. बिग बॉस ओटीटी 3 चांगलाच धमाका करत असताना दुसरीकडे घरात मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाहीतर थेट साई केतन राव याला आईवर शिवीगाळ करण्यात आला. यामुळे घरात मोठा हंगामा झालाय. कवकेश कटारिया याने साई केतन रावला शिवीगाळ केला. ज्यानंतर घरातील वातावरण हे चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. घरातील एका मुद्दावर साई केतन राव हा आपले म्हणणे मांडत होता. मुळात म्हणजे साई केतन याचे बोलणे कटारिया याला ऐकायचे नव्हते. कटारिया आपले बोलले ऐकत नसल्याने साई केतन हा भडकतो. 

साई केतन राव हा कटारिया याला आक्षेपार्ह शब्द बोलतो. त्यानंतर मग कटारिया थेट साई केतन राव याला आईवर शिवीगाळ करतो. यानंतर साई केतन राव हा चांगलाच चिडतो. कटारियाला याला मारण्यासाठी साई केतन राव हा त्याच्या अंगावर धावून जातो. मात्र, यावेळी घरातील काही सदस्य हे त्याला पकडताना दिसतात. 

अरमान मलिक, त्याची पत्नी हे साई केतनला पकडून ठेवतात. मात्र, साई केतनचा राग इतका जास्त वाढला की, त्याने थेट बिग बॉसच्या घरातील खुर्ची उचलून फेकली. मुळात म्हणजे काही दिवसांपूर्वीच साई केतन याने घरातील सदस्यांना सांगितले की, त्याच्यासाठी त्याची आई किती जास्त महत्वाची आहे.

वडिलांनंतर त्याच्या आईने किती जास्त कष्ट घेतले आणि त्यांना शिकवले हे साई केतन राव याने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यामध्येच आज लवकेश कटारिया याने त्याला आईवर शिवीगाळ केल्याने तो अधिकच भडकल्याचे बघायला मिळतंय. विकेंडच्या वारमध्ये अनिल कपूर आता या वादावरून घरातील सदस्यांना चांगलेच खडेबोल सुनावताना दिसणार आहेत.

अरमान मलिक याच्या पत्नीबद्दल चुकीची कमेंट केल्यामुळे अरमानने काही दिवसांपूर्वीच विशाल पांडे याच्या कानाखाली जाळ काढला. त्यानंतर घरातील सदस्यांनी मोठा निर्णय घेत अरमानला कायमसाठी नॉमिनेशनमध्ये टाकले. त्यानंतर आता हे बिग बॉस ओटीटी 3 मधील सर्वात मोठी भांडणे आहेत. बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान केल्याने आता साई केतन राव याला काय शिक्षा मिळते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.