COLORS TV | बिग बॉसची विनर फिक्स्ड? का ट्विटरवर ट्रेंड होतोय TATTI CHANNEL COLORS TV? वादाला तोंड का फुटलंय?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मृणाल पाटील

Updated on: Jan 31, 2022 | 9:27 AM

तेजस्वी प्रकाशला निर्मात्यांकडून बिग बॉस 15 च्या ट्रॉफीसह, एकूण 40 लाख रुपये बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. हे सर्व असतानाच दुसरीकडे मात्र ट्विटरवर ('TATTI CHANNEL COLORS TV') टट्टी चॉनेल कलर्स टिव्ही हा हॉशटॉग ट्रेंड होतोय. आता पर्यंत 1.07 मिलीयन लोकांनी हॉशटॉग वापरला आहे.

COLORS TV | बिग बॉसची विनर फिक्स्ड? का ट्विटरवर ट्रेंड होतोय TATTI CHANNEL COLORS TV? वादाला तोंड का फुटलंय?
TATTI CHANNEL COLORS TV Trending

मुंबई : काल टीव्हीवरील वादग्रस्त शो बिग बॉस 15 (Big boss 15) ची ट्रॉफी तेजस्वी प्रकाशने जिंकली. 4 महिने चाललेल्या या शोमध्ये तेजस्वी प्रकाशने भरपूर मनोरंजन केले. सुरुवातीपासूनच तेजस्वी प्रकाश यांनी जनतेला गुंतवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या संपूर्ण प्रवासात तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) यांच्याकडून अनेकदा चुका झाल्या पण त्यांनी प्रत्येक गोष्टीत आपल्या निरागस शैलीने लोकांची मने जिंकली. बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये तेजस्वी प्रकाशने प्रतीक सहजपालचा थोड्या फरकाने पराभव केला आहे. तेजस्वी प्रकाशला निर्मात्यांकडून बिग बॉस 15 च्या ट्रॉफीसह, एकूण 40 लाख रुपये बक्षीस (Price)रक्कम देखील मिळाली आहे. बिग बॉस ट्रॉफी जिंकण्यासोबतच त्याचे नाव नागिन 6 शी देखील जोडले गेले आहे.

हे सर्व असतानाच दुसरीकडे मात्र ट्विटरवर (‘TATTI CHANNEL COLORS TV’) टट्टी चॉनेल कलर्स टिव्ही हा हॉशटॉग ट्रेंड होतोय. आता पर्यंत 1.07 मिलीयन लोकांनी हॉशटॉग वापरला आहे. हा बिग बॉसची विनर फिक्स्ड? तेजस्वी प्रकाश विजेती कशी झाली? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहे. तेजस्वी प्रकाशच्या विजयावर जनता जास्त खूश नाही आहे हे यातून दिसून आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

का ट्विटरवर ट्रेंड होतोय TATTI CHANNEL COLORS TV?
बिग बॉस 15 या रियालीटी शोचा विजेता आधीच ठरवला गेला आहे. असे म्हणतं बिग बॉसच्या चाहत्यांनी “टट्टी चॉनेल कलर्स टिव्ही” हा हॉशटॉग वापरत अनेक मीम शेअर केले आहेत. तेजस्वी प्रकाश टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सीझन 15 ची विजेती ठरली आहे. तर प्रतीक सहजपाल हा पहिला उपविजेता ठरला आहे. तेजस्वीला ट्रॉफीसह 40 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. करण कुंद्रा आणि निशांत भट्ट यांनी या हंगामातील टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.

करण कुंद्रासाठी उमरची पोस्ट
बिग बॉस शोमधून बाहेर पडलेला उमरने करणसाठी एक पोस्ट लिहली आहे. “करण कुंद्रा अंतिम फेरीच्या टॉप 2 मध्ये स्थान मिळवू शकला नाही आणि कमी मतांमुळे तो बाहेर पडला. करण बाहेर पडताच उमरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि कौतुक केले. त्याने लिहिले, ‘करण तू खूप छान खेळलास. आयुष्यात कधी कधी असं होतं की आपल्याला हवं ते मिळत नाही. तुम्ही त्याची पात्रता नाही म्हणून नाही, तर त्यापेक्षा जास्त पात्र आहात म्हणून.’

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
खबरी नावच्या एका हॅन्डलवरुन “TATTI चॅनल कलर्स टीव्ही भारतात 600 हजार ट्विटसह ट्रेंडिंग करत आहे. देवाच्या कृपेने हे 1 मिलियन व्हावेत. 😂😂 जर तुम्ही या ट्रेंडचा भाग असाल तर रिट्विट करा. #BiggBoss15 Finale #BiggBoss15” असे ट्विट करण्यात आले आहे.

मी कधीच माफ करणार नाही @ColorsTV @BiggBoss या चित्रासाठी कधीच नाही!! TATTI चॅनल कलर्स टीव्ही असं एका फॅनच मतं आहे.

तेजस्वी हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव 
तेजस्वी प्रकाश हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. तेजस्वी प्रकाशने अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. आत्तापर्यंत तेजस्वी प्रकाशने अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये भाग घेतला आहे. ‘स्वरागिनी’पासून ‘पहरेदार पिया की’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का 2’ पर्यंत अनेक शोमध्ये तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

संबंधीत बातम्या :

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांची कोरोनावर मात, न्यूमोनियातून देखील बऱ्या, राजेश टोपे यांची माहिती

Tejaswi Prakash : बॉयफ्रेंड हरला, गर्लफ्रेंड जिंकली, तेजस्वी प्रकाशच्या हाती चमचमती ट्रॉफी अन् 40 लाख रुपये!

Bigg Boss 15 Grand Finale Winner: तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती, प्रतिक सेहजपाल उपविजेता


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI