Bigg Boss 15 Grand Finale Winner: तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती, प्रतिक सेहजपाल उपविजेता

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी

Updated on: Jan 31, 2022 | 8:07 AM

बिग बॉस 15 चा ग्रॅण्ड फिनाले पार पडला आणि बिग बॉसला 15 वा सिझन

Bigg Boss 15 Grand Finale Winner: तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती, प्रतिक सेहजपाल उपविजेता
तेजस्वी प्रकाश

मुंबई : कोट्यवधी फॅन्सची प्रतिक्षा संपलीय कारण बहुचर्चित बिग बॉस  15 सिझनला (Bigg Boss 15 Grand) विजेती मिळालीय. तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash) जेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केलीय. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) तेजस्वी प्रकाश हिचं  नाव जाहीर केलं आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सेहजपाल (Pratik Sehajpal) या दोघांमध्ये जेतेपदाची लढत झाली. यामध्ये तेजस्वी प्रकाशने बाजी मारली. तेजस्वी प्रकाशला 40 लाखांचा चेक आणि ट्रॉफी मिळाली. या ग्रँड फिनालेला मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.

करण कुंद्रा विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर

बिग बॉस 15 चा हँडसम हंक करण कुंद्रा बिग बॉसचा विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. तो विजेता होईल, असा बऱ्याच जणांना अंदाज होता. पण हा अंदाज खोटा ठरला. परंतु संपूर्ण स्पर्धेत मात्र करण अतिशय चांगला खेळला. पण आज दुर्दैवाने त्याला अंतिम २ मध्ये धडक मारण्यात अपयश आलं.

शमिता शेट्टी शोमधून बाहेर

तत्पूर्वी, शमिता शेट्टी बिग बॉस 15 ची विजेती होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडली. शमिताने बिग बॉस शोमध्ये तिसऱ्यांदा प्रवेश केला होता, परंतु यावेळीही शमिता ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ गेल्यानंतर शोमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे शमिताचं यंदाही विजेतेपदाचं स्वप्न भंगलं.

शमिता- राकेशचा रोमँटिक डान्स, करण-तेजस्वी एकसाथ

फिनालेमध्ये शमिता शेट्टीने तिचा प्रियकर राकेश बापटसोबत पुष्पाच्या सुपरहिट सामी-सामी गाण्यावर डान्स केला. शमिता आणि राकेश यांच्यातील धमाकेदार केमिस्ट्री पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. याशिवाय करण कुंद्राने त्याची लेडी लव्ह तेजस्वीसोबत रोमँटिक डान्सही केला.

‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर रश्मीचा धमाकेदार डान्स

बिग बॉस 15 सिझनची वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत, रितेश, रश्मी देसाई आणि राजीव अडातिया यांनी दमदार डान्स सादर केले. राखीने तिच्या पतीसोबत जबरदस्त डान्स केला. त्याचवेळी रश्मी देसाईने टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर तिच्या धमाकेदार डान्सने पाण्याला ‘आग’ लावली.

शहनाजकडून सिद्धार्थ शुक्लाला स्पेशल ट्रिब्युट

शहनाज गिलने बिग बॉस 13 चा विजेता तिचा खास मित्र दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला एका सुंदर नृत्याविष्काराद्वारे विशेष आदरांजली वाहिली. तिच्या डान्स परफॉर्मन्सदरम्यान शहनाजला सिद्धार्थसोबतच्या सीझन 13 चा तिचा सुंदर प्रवासही आठवला. सिद्धार्थसाठी शहनाजचा भावनिक अभिनय पाहून चाहत्यांचेही डोळे ओलावले.

शहनाज गिलने बिग बॉस 15 च्या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली. शोमध्ये सलमान खानला भेटल्यानंतर शहनाज गिल खूपच भावूक झाली होती. शहनाजच्या सिद्धार्थ शुक्लासोबतच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सलमान खानने शहनाजला मिठी मारली आणि तिचं बिग बॉसच्या घरात स्वागत केलं. यानंतर शहनाजने सलमान खानसोबत बरीच मस्ती केली

संबंधित बातम्या

शमिताचं विजयी स्वप्न भंगलं, बिस बॉसमधून आऊट, दीपिका पदुकोनने दाखवला घरचा रस्ता

10 लाख घेत निघाला घरी! निशांत भट्टचा बिग बॉसच्या घरातून निघण्याचा निर्णय चुकला? काय म्हणाला भाईजान

Bigg Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15च्या ग्रॅड फिनालेला सेलिब्रिटींची हजेरी, आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी कलाकारांची उपस्थिती

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI