
Dharmendra Viral Video From ICU : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सध्या सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालं आहे पण, घरी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत… दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ शूट आणि व्हायरल करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी समोर आली होती.. पण कर्मचाऱ्याला खरंच अटक केली आहे का? याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही किंवा अटक करण्यात आलेली नाही. चौकशी सुरू झाली असली तरी, कर्मचाऱ्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
सांगायचं झालं तर, 1 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयातल दाखल करण्यात आलं होतं.. प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात अआलं… त्यानंतर कळलं की धर्मेंद्र यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे…. उपचार सुरु असताना धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची माहिती देखील समोर आली.. अशात धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती दिली.
सांगायचं झालं तर, 89 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला… त्यांच्यावर अनेक दिवस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांना 12 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. आता धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.
डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर धर्मेंद्र याला डिस्चार्ज मिळाला. सनी देओल, बॉबी देओल आणि पत्नी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, जुहू येथील घरी अभिनेत्यासाठी आयसीयू वॉर्ड तयार करण्यात आला आहे, जिथे त्यांच्यावर चार नर्स आणि एका डॉक्टरच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे. तर देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या प्रकृतीचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत.