Boycott Maldives | बिपाशाचा नवऱ्यासोबत मालदीवमध्ये रोमान्स, नेटकऱ्यांकडून ट्रोल
Bipasha Basu in Maldives | सध्या देशभरात #BoycottMaldives हा ट्रेंड सुरू आहे. त्याचदरम्यान अभिनेत्री बिपाशा बासू हिने तिचे मालदीवमधील सुट्ट्यांचे फोटो शेअर केले आहेत. मात्र सोशल मीडिया युजर्सनी तिला मालदीवमधील सुट्ट्यांसाठी ट्रोल करत तिची चांगलीच शाळा घेतली.

Bipasha Basu trolled for vacation in Maldives | अभिनेत्री बिपाशा बसू नेहमी चर्चेत असते. तिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. मात्र या फोटोंमुळे ती चांगलीच अडचणीत सापडली आहे. कारण वाढदविसाच्या सेलिब्रेशनसाठी बिपाशा तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आणि मुलीसह मालदीवला गेली होती, आणि तिथलेच फोटो तिने शेअर केले. पण सोशल मीडिया युजर्सना हे काही आवडलं नाही. त्या फोटोवरून नेटकऱ्यांनी तिला बरंच ट्रोल केलं आहे.
#BoycottMaldives ट्रेंड जोरात
सध्या सोशल मीडियावर #BoycottMaldives हा ट्रेंड जोरात सुरू आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच लक्षद्वीपला गेले होते. तेथील काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र त्यावर मालदीव सरकारमधील काही मंत्र्यांनी आपत्तीजनक टिप्पणी केल्याने नव्या वादाला सुरूवात झाली. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. त्यामुळे सोशल मीडियावर #BoycottMaldives हा ट्रेंडही सुरू झाला. याच दरम्यान अभिनेत्री बिपाशा बसू हिने मालदीव व्हेकेशनचे फोटो शेअर केल्याने तिला चांगलाच फटका बसला.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी घेतली बिपाशाची शाळा
खरंतर ७ जानेवारीला बिपाशा बसू हिचा वाढदिवस असतो. वाढदिवसानिमित्त बिपाशा ही तिचा पती करणसिंग ग्रोव्हर आणि मुलगी देवी हिच्यासोबत मालदीवला गेली. तिथे तिने वाढदिवस साजरा केला आणि सुट्ट्यांचा आनंदही घेतला. याच सेलिब्रेशनचे फोटो बिपाशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. मात्र ते फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स काही खुश झाले नाहीत. उलट अनेक जण तिच्यावर रागावले. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. काहींनी तर तिला मालदीव ऐवजी लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला दिला. ‘देशात काय चाललंय हे तुला माहीत असलं पाहिजे’ अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘बायकॉट मालदीव’ अशी कमेंट दुसऱ्याने केली. ‘लाज वाटली पाहिजे, सेल्फ रिस्पेक्ट सर्वात महत्वाचा’ असे एकाने लिहीले. तर आणखी एका युजरने तर तिला थेट सल्लाच दिला. ‘मालदीव सोड, लक्षद्वीपला जा’ असे त्याने सांगितले.



सेलिब्रिटीही आले मोदींच्या समर्थनार्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्य मालदीवला चांगलेच अंगलट आले आहे. अनेक भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द केला आहे. आतापर्यंत 8000 जणांना हॉटेल बुकींग रद्द केले आहे. केवळ सर्वसामान्य भारतीयच नाही तर अख्ये बॉलीवूड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आले आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी मालदीव ऐवजी लक्षदीपच्या पर्यटनाला जाण्याचे आवाहन केले आहे. बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर आणि जॉन अब्राहमसह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले.
