
सोनम कपूर आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनम कपूरचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबईत झाला होता. चाहत्यांना एका चांगल्या अभिनेत्रीपेक्षा फॅशन सेन्ससाठी अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर माहित आहे. अशा परिस्थितीत खास दिवशी अनिल कपूरनं मुलीच्या बालपणीचे काही फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिल कपूरने सोनमच्या लहानपणीचे वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमचे हे फोटो फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. फोटोंमध्ये सोनम खूप क्यूट दिसत आहे.

फोटो शेअर करत अनिल कपूरनं लिहिलं की, ‘ही मुलगी जी आपल्या स्वप्नांना पूर्ण करते आणि स्वत:च्या अंतःकरणाचं ऐकते, तुला मोठं होत असताना पाहणं हे स्वप्न साकार करण्यासारखे आहे, मला भाग्यवान असल्यासारखं वाटतं.’

पुढे असं लिहिलं की ‘तू व आनंद सुरक्षित आणि निष्ठावंत आहात याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आणि आम्ही पुन्हा तुझ्याबरोबर राहण्याची वाट पाहू शकत नाही ... वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनम बेटा! तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझी आठवण येते’

अनिल कपूरनं आपल्या पोस्टसाठी आपल्या मुलीसाठी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत, ज्या सर्वांनाच आवडत आहेत. अनिल कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

आनंद आणि सोनम यांनी 8 मे 2018 रोजी मुंबईत लग्न गाठ बांधली. सोनम अनेक दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.