बर्थडे स्पेशल : दिग्दर्शक सुभाष घई यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

| Updated on: Jan 24, 2022 | 9:00 AM

सुरूवातीच्या काळात सुभाष घई जेव्हा काम मिळवण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांना पटकन कोणतेचं काम मिळू शकले नाही, त्यामुळे निराश झालेले सुभाष घई दिग्दर्शनाकडे वळले. तसेच त्यात त्यांना चांगले यश सुध्दा मिळाले आहे. सुभाष घई यांनी मुक्ता यांच्याशी लग्न केले आणि त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव देखील मुक्ता आहे.

बर्थडे स्पेशल : दिग्दर्शक सुभाष घई यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
दिग्दर्शक सुभाष घई (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई – बॉलिवूडने (bollywood) आत्तापर्यंत अनेक कलाकारांना आणि दिग्दर्शक (director) खूप काही दिलं. त्यापैकी एक म्हणजे नावाजलेले निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई (subhash ghai), यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. त्यांनी ‘ऐतराज’, ‘इकबाल’, ‘चाइना टाउन’, ‘अपना सपना मनी मनी’ हे हीट चित्रपट (film) दिले त्यामुळे त्यांची इंडस्ट्रीमध्ये वेगळी आहे.

त्यांचा स्ट्रगल काळ

दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म 24 जानेवारी 1945 ला नागपूर येथे झाला. त्यावेळी सुभाष घई यांचे वडील दिल्लीत दंत चिकित्सक होते. पुढे दिग्दर्शक सुभाष घई यांनी रोहतक येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपला रस्ता पुर्णपणे फिल्म इंडस्टीकडे वळवला, त्यासाठी त्यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि घेतलं सुध्दा

सुरूवातीच्या काळात सुभाष घई जेव्हा काम मिळवण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांना पटकन कोणतेचं काम मिळू शकले नाही, त्यामुळे निराश झालेले सुभाष घई दिग्दर्शनाकडे वळले. तसेच त्यात त्यांना चांगले यश सुध्दा मिळाले आहे. सुभाष घई यांनी मुक्ता यांच्याशी लग्न केले आणि त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव देखील मुक्ता आहे.

16 पैकी 13 चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरले

सुभाष घई हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आहेत. त्यांनी कालीचरण, हीरो, जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, देश, ताल या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ते हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखले जातात. सुभाष घई यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत सुमारे 16 चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यापैकी 13 चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक-बस्टर हिट ठरले. 2006 मध्ये त्यांना इक्बाल या सामाजिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

प्रेमात पडले

पुण्यात शिकत असताना एफटीआयआयमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यामध्ये सुभाष घई आणि रेहाना पहिल्यांदा भेटले होते. दोघांची आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केला होता. मात्र, दोघेही कुठे झुकले नाही आणि अखेर 1970 मध्ये दोघांनी लग्न केले. यानंतर रेहानाने धर्म स्वीकारला आणि मुक्ता झाली. नंतर सुभाष घई यांनी ‘मुक्ता आर्ट्स’ निर्मिती कंपनी सुरू केली. यानंतर 1978 मध्ये जेव्हा सुभाष यांनी त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी मेघना यांना दत्तक घेतले. 2000 मध्ये सुभाष घई आणि मुक्ता यांना स्वतःचे मूल झाले. दोघांनी त्याचे नाव मुस्कान घई ठेवले.

चित्रपट विमा पॉलिसी सुरू केली

सुभाष घई हे त्यांच्या ताल चित्रपटाद्वारे चित्रपट विमा पॉलिसी आणणारे पहिले बॉलीवूड निर्माते आहेत. चित्रपटांना बँकांकडून वित्तपुरवठा करण्याची संकल्पना सुरू करण्याचे श्रेयही त्यांना जाते. इंडस्ट्रीला नवीन कलाकार देण्यासाठी सुभाष घई यांनी व्हिसलिंग वूड्स नावाची अॅक्टिंग स्कूलही उघडली आहे. ही शाळा जगातील शीर्ष 10 चित्रपट शाळांपैकी एक मानली जाते.

सुभाषची घई यांची अभिनयाची शाळा मुंबईत आहे

सुभाष घई यांनी बॉलिवूडला ‘रामलखान’, ‘खलनायक’, ‘परदेस’, ‘सौदागर’, ‘ताल’ सारखे अनेक चित्रपट दिले आहेत. पण आता सुभाष घई दिग्दर्शनाच्या जगापासून दूर अभिनयाची शाळा चालवत आहेत. सुभाष घई यांची व्हिसलिंग वुड्स नावाची अभिनय संस्था मुंबईत आहे. ही शाळा जगातील शीर्ष 10 चित्रपट शाळांपैकी एक मानली जाते. या अॅक्टिंग स्कूलमध्ये सुभाष नवोदितांना अभिनय आणि चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देत आहेत.

सैफचा अली खानचा मुलगा इब्राहिम करतोय अभिनेत्रीच्या मुलीला डेट ? जाणून घ्या सत्य

नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ लवकरच प्रदर्शित होणार, ओटीटी की थिअटर?; मंजुळेंनी अखेर पडदा उघडला!

Katrina Kaif Education : कॅटरीना शाळेत जाऊ शकली नाही, पण फाडफाड इंग्रजी बोलते! नेमकं कारण काय ?