Katrina Kaif Education : कॅटरीना शाळेत जाऊ शकली नाही, पण फाडफाड इंग्रजी बोलते! नेमकं कारण काय ?

Katrina Kaif Education : कॅटरीना शाळेत जाऊ शकली नाही, पण फाडफाड इंग्रजी बोलते! नेमकं कारण काय ?
अभिनेत्री कॅटरिना कैफ

अनेक चित्रपटांमध्ये आपण कटरिना कैफला इंग्रजी फडाफड बोलत असताना पाहतो. त्यावेळी तिचं शिक्षण किती झालं असेल असा प्रश्न अनेकांना पडत असेल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 23, 2022 | 4:40 PM

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय, याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु त्या करत असलेल्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष असते. अनेक बॉलिवूडमधील आघाडीच्या हिरोईन आहेत, त्यांचं किती शिक्षण झालं हे कोणालाचं माहित नाही. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आहे. कटरिना कैफचं शिक्षण (Education) कसं झालं हे अद्याप अनेकांना माहित नाही. टॉप अभिनेत्रीच्या (top actress) यादीत तीचं नावं घेतलं जातं. तसेच लाखो चाहते तिच्या सौदर्यावर आणि अदावर घायाळ होतात. पण सगळ्यांच्या मनावर राज्य करणा-या कॅटरीना कैफ शिक्षण किती झालं हे माहित आहे का ?

अनेक चित्रपटांमध्ये आपण कॅटरीना कैफला इंग्रजी फडाफड बोलत असताना पाहतो. त्यावेळी तिचं शिक्षण किती झालं असेल असा प्रश्न अनेकांना पडत असेल. पण तिच्या चाहत्यांना हे माहित आहे का ? की, कटरिना कैफ कधीचं शाळेत गेलेली नाही. त्याचं कारणही तसंच आहे, कॅटरीना कैफचे वडिल मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे व्यापारी होते. तसेच कटरिना कैफच्या आई सुजान या देखील ब्रिटीश आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

यामुळे झाले नाही शिक्षण

कॅटरीना कैफचं लहानपण जवळजवळ 18 देशांमध्ये गेले आहे. सततच्या 18 देशांमधल्या प्रवासादरम्यान कटरिना कैफला शाळेत जाता आलं नाही. त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी घरच्यांनी होम ट्यूटर लावला होता. ते दिलेल्या वेळेत तिला घरी शिकवण्यासाठी येत होते. कॅटरीना कैफने वयाच्या 14 वर्षी आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरूवात केली. काही काळ परदेशात राहिल्यानंतर मुंबईत आली, मोठ्या चित्रपटात काम केल्यानंतर कटरिना कैफला चांगली प्रसिध्दी मिळाली. आज तिला बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीसोबत गणलं जातं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

असा आहे कटरिना कैफला परिवार

कॅटरीना कैफला तिच्यापेक्षा मोठ्या तीन बहिणी आहेत, तसेच तिला एक मोठा भाऊ देखील आहे. तिने आत्तापर्यंत भारतातील विविध भाषांमध्ये काम केले आहे. नुकतेच कटरिना कैफने विकी कौशलसोबत लग्न केले आहे.

Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित

धनुष-ऐश्वर्याचा काडीमोड, पण राहतात एकत्रच एका हॉटेलात! रजनीकांतच्या व्याहींनी सांगितलं कारण

photos : साडीतही मोनालिसाचा धुमाकूळ, फोटो झाले व्हायरल; तुम्ही फोटो पाहिले का ?

 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें