Birthday Special : मराठमोळ्या आशाताईंनी रहमानला विश्वासार्हता दिली? वाचा तनहा तनहाची अजरामर गोष्ट

| Updated on: Jan 06, 2021 | 6:24 AM

रंगीला आला आणि त्यातील गाण्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आणि 1995 साली बॉलिवूडमध्ये रहमानच्या आगमनाची खऱ्या अर्थाने नोंद झाली.

Birthday Special : मराठमोळ्या आशाताईंनी रहमानला विश्वासार्हता दिली? वाचा तनहा तनहाची अजरामर गोष्ट
Follow us on

मुंबई: ” ‘रंगीला’साठी आम्ही गाणी बसवत नव्हतो. तर ‘रंगीला’ची गाणी बसवणं हे आमच्यासाठी काही तरी नवीन शोधण्यासारखं होतं. त्याचा साऊंड ट्रॅक हा स्वाभाविकपणे आला आणि हा त्यावेळी केलेला एक प्रयोगच होता. त्यातच आशा भोसले यांच्या आवाजाने ‘रंगीला’च्या गाण्यांना चार चाँद लावले आणि इतिहास घडला…” संगीताचा जादूगार ए. आर. रहमान सांगत होता. (Musician A. R. Rehman Birthday Special Story)

सुप्रसिद्ध संगितकार ए.आर रहमान यांचा आज वाढदिवस आहे. रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1966 मध्ये तामिळनाडू येथील एका सांगितीक कुटुंबात झाला. ए.आर रहमानचं मूळ नाव ए. एस. दिलीप कुमार असून रहमानचं हे मूळ नाव अनेकांना माहीतही नसेल. 1992 सालापासून आजवर त्याने अनेक भाषांमध्ये मंत्रमुग्ध करणारी गाणी गायली आणि संगीतबद्धही केली आहेत. त्यात विषेश म्हणजे “तन्हा तन्हा,” “रंगीला रे” आणि “क्या करें, क्या न करें” या गाण्यांमुळे ए. आर. रहमानची खास ओळख बनली.

रंगीला आला आणि त्यातील गाण्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आणि 1995 साली बॉलिवूडमध्ये रहमानच्या आगमनाची खऱ्या अर्थाने नोंद झाली. 1995मध्ये त्याने बॉलिवूडला सातत्याने सुपरडूपर हिट गाणी दिली. त्यात “तन्हा तन्हा,” “रंगीला रे” आणि “क्या करें क्या ना करें” या गाण्यांचा समावेश होताच. सोबतच रहमानच्या 1992 मधील ‘रोझा’ आणि 1995 मध्ये रिलीज झालेला ‘बॉम्बे’ या चित्रपटांमधील गाणीही रसिकांच्या कानावर रुंजी घालत होती.

मजाक मस्ती करता करता ‘रंगीला’ची गाणी

‘रंगीला’ला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रहमानने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी उलगडल्या, “रंगीलाची गाणी तयार करणं म्हणजे काहीतरी नवीन शोधण्यासारखं होतं. हे साऊंडट्रॅक अगदी नॅचरली तयार झालं. त्यामुळे आम्हाला या चित्रपटाचा फार दबाव जाणवला नाही. कारण मी. रामू आणि गीतकार मेहबूबसोबतच्या नवीन कंपनीचा आनंद घेत होतो. आम्ही फक्त गप्पा मारायचो विनोद करायचो आणि मस्त मजा करत होतो.”

कोरियोग्राफर सरोज खान, अहमद खान, अभिनेते आणि निर्माता झामु सुगंध यांच्यासह संपूर्ण चित्रपटाच्या टीमला रहमानने रंगीलाच्या यशाचं श्रेय दिलं. सोबतच रहमान यांनी चित्रपटासाठी काम करताना बरंच काही शिकायला मिळाल्याचंही स्पष्ट केलं.

आशाताईंकडून विश्वासार्हता; वाचा ‘तनहा तनहा’ची अजरामर गोष्ट

आम्ही काम केलेलं पहिलं गाणं म्हणजे ‘तन्हा तन्हा ’आणि त्यानंतर ‘रंगीला रे’. आम्ही घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आशा भोसलेंना हे गाणं गायला लावणं. त्यांच्या आवाजानं या गाण्यात एक विलक्षण गोष्ट आणली. त्यांनी या साउंडट्रॅकला मोठ्या प्रमाणात विश्वासार्हता दिली, कारण मेहबूब, रामू आणि मी, आम्ही सर्वजण नवीन होतो, असं त्याने सांगितलं.

इतर बातम्या:

लोकल क्रांतिकारी म्हणत कंगनाने डिवचलं, भडकलेल्या दिलजीतचं जशास तसं प्रत्युत्तर!

Finally | कपिल शर्माची चाहत्यांना मोठी गुड न्यूज, नववर्षात या सीरीजमधून धमाका करण्यास सज्ज!

Musician A. R. Rehman Birthday Special Story