Shah Rukh Khan King Film : दीपीका पादुकोण फक्त मोहरा, हा जिहादी यामागे आहे, भगव्या ड्रेसवरुन भाजप आमदाराचा शाहरुख खानवर संताप

Shah Rukh Khan King Film : भाजप आमदार रविंदर नेगी यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. ज्यात नेगी हे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्याबद्दल कठोर शब्द वापरताना दिसतायत.

Shah Rukh Khan King Film : दीपीका पादुकोण फक्त मोहरा, हा जिहादी यामागे आहे, भगव्या ड्रेसवरुन भाजप आमदाराचा शाहरुख खानवर संताप
Shah Rukh Khan-Deepika Padukone
| Updated on: Nov 06, 2026 | 11:54 AM

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘किंग’ रिलीज आधीच वादात सापडला आहे. ‘किंग’ चित्रपटात ‘तू मिल जाए’ हे गाणं आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्या ड्रेसवरुन आता वाद निर्माण झाला आहे. राजकीय पार हाय झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंदर सिंह नेगी उर्फ रवी नेगी यांनी दीपिकाच्या भगव्या ड्रेसवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी शाहरुख खानला इशारा दिला आहे. गाण्याचा तो वादग्रस्त भाग चित्रपटातून तात्काळ हटवा अशी मागणी आमदार नेगी यांनी केली आहे. अन्यथा संपूर्ण देशात विरोध प्रदर्शन करण्याची धमकी दिली आहे.

भाजप आमदार रविंदर नेगी यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. ज्यात नेगी हे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्याबद्दल कठोर शब्द वापरताना दिसतायत. “हा शाहरुख खानचा चित्रपट आहे. तो त्याचा नेचर आहे. शाहरुख आणि या देशातले सर्व जिहादी लोक इथे पैसा कमावतात आणि देशाला बदनाम करतात. त्यांना भगव्या रंगाचा प्रॉब्लेम आहे. दीपीका पादुकोण फक्त एक मोहरा आहे. हा जिहादी यामागे आहे. ज्या सनातनला आम्ही मानतो, तिथे ते असे कपडे घालून डान्स करतात” असं रविंदर नेगी यांनी म्हटलं आहे.

Loading...

बिकिनी विरोधात देशभर विरोध प्रदर्शन झालं होतं

आमदार रवी नेगी यांनी तीन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या वादाची सुद्धा आठवण करुन दिली. त्यावेळी दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकिनी विरोधात देशभर विरोध प्रदर्शन झालं होतं. “सनातन धर्माचा अपमान देशातला कुठलाही नागरिक सहन करणार नाही” असं नेगी स्पष्ट शब्दात म्हणाले. “फिल्म मेकर्सनी लवकरात लवकर तो आक्षेपार्ह सीन किंवा गाण्याचा भाग हटवावा. अन्यथा सनातन संघटनेच्या विरोधाचा सामना करण्यासाठी तयार राहा” अशी वॉर्निंग त्यांनी दिली.

शाहरुख खानने काय म्हटलं?

‘पठाण’ चित्रपटाच्यावेळी सुद्धा ‘बेशर्म रंग’गाण्यातील भगव्या रंगाच्या वस्त्रावरुन देशभरात राजकीय आणि सामाजिक संघटनांनी विरोध केला होता. आता ‘किंग’ चित्रपटातील दीपिकाच्या ड्रेसच्या रंगावरुन वाद सुरु झालाय. त्यामुळे फिल्म इंडस्ट्री आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या सर्व वादावर शाहरुख खान, दीपीका पादुणकोण आणि चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us