Ravinder Singh Negi : ईदला पशुबळी दिला जातो, तेव्हा दिया मिर्झाची अक्कल कुठे जाते? भाजप आमदाराचा घणाघात

Ravinder Singh Negi On Dia Mirza : दिया मिर्झाच्या प्रकरणावर भाजप आमदार रविंदर सिंह नेगी यांनी संताप व्यक्त केला असून अभिनेत्रीला सुनावलं आहे.

Ravinder Singh Negi : ईदला पशुबळी दिला जातो, तेव्हा दिया मिर्झाची अक्कल कुठे जाते? भाजप आमदाराचा घणाघात
| Updated on: Nov 06, 2026 | 9:38 PM

अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळीविषयक जनजागृती व्हिडीओवरून सुरू झालेला वाद आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. दिवाळीत फटाके फोडू नयेत, पर्यावरणाची काळजी घ्यावी, असं आवाहन करणाऱ्या दिया मिर्झाच्या व्हिडिओवर भाजप आमदार रविंदर सिंह नेगी उर्फ रवी नेगी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दिवाळी आणि ईद या सणांच्या संदर्भात दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

‘हा एक सुनियोजित कट आहे’

Loading...

दिया मिर्झाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार रविंदर नेगी म्हणाले की, हा एक सुनियोजित कट आहे. काही लोकांकडून जाणीवपूर्वक अशा प्रकारची वक्तव्यं केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिवाळीमध्ये फटाके फोडू नका, असं आवाहन करणाऱ्यांची भूमिका इतर सणांच्या वेळी मात्र वेगळी असते, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या वक्तव्यामध्ये रविंदर यांनी ईदच्या सणाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, दिया मिर्झा दिवाळीत फटाके फोडू नका, असं सांगते, मग ईदच्या वेळी तिची पर्यावरणाबाबतची जागरूकता कुठे जाते? ईदच्या दिवशी उघड्यावर होणाऱ्या पशुबळीच्या वेळी रस्त्यांवर मांसाचे तुकडे पडतात, तेव्हा हे लोक आवाज का उठवत नाहीत? तेव्हा त्यांची अक्कल कुठे जाते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून राजकीय वातावरण तापलं

दिवाळीच्या काळात पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी दिया मिर्झानं एक व्हिडिओ तयार केला होता. मात्र, या व्हिडीओवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून हा व्हिडिओ हटवण्यात आल्याची बाबही चर्चेत आली होती. या प्रकरणावरून राजकीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, रविंदर यांच्या या वक्तव्यामुळे दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पर्यावरण संवर्धन, धार्मिक सण आणि सार्वजनिक स्वच्छता या मुद्द्यांवरून आता राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us