बाबांवर कर्जाचं ओझं..; मतदानासाठी पोहोचलेल्या अक्षय कुमारचे मुलीने धरले पाय, अभिनेत्याने जे केलं..

BMC Election 2026: बाबांवर कर्जाचं ओझं, मदत करा..; मतदानासाठी पोहोचलेल्या अक्षय कुमारचे मुलीने धरले पाय, Video पाहून पाणावतील डोळे! सध्या अभिनेता अक्षय कुमार याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

बाबांवर कर्जाचं ओझं..; मतदानासाठी पोहोचलेल्या अक्षय कुमारचे मुलीने धरले पाय, अभिनेत्याने जे केलं..
shweta Walanj | Updated on: Jan 15, 2026 | 1:19 PM

BMC Election 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. सेलिब्रिटींनी मतदान केल्यानंतर जनतेला देखील मतदानाचा हक्क बजवण्यास सांगितलं आहे. अभिनेता अक्षय कुमार याने देखील मतदानाचा हक्क बजावला. पण मतदान केंद्राबाहेर पडल्यानंतर असं काही झालं, ज्यामुळे तुमचे देखील डोळे पाणावतील. मतदानासाठी पोहोचलेल्या अक्षय कुमारचे एका मुलीने पाय धरले आणि मदत मागू लागली.. तेव्हा अभिनेत्याने असं काही केलं… ज्यामुळे सर्वत्र खिलाडी कुमारचं कौतुक होत आहे. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत मतदान करणाऱ्या काही सेलिब्रिटींपैकी अक्षय कुमार हा पहिला होता. मतदान केंद्राबाहेर येताच त्याने माध्यमांसोबत संवाद साधला… अभिनेता म्हणाला, ‘आज रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे… त्यामुळे सर्व मुंबईकरांनी घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे…’, जनतेला मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर अभिनेता स्वतःच्या गाडीकडे जात असताना एका मुलीने अभिनेत्याकडे मदत मागितली.

 

 

मुलगी म्हणाली, ‘माझे बाबा कर्जबाजारी झाले आहे. कृपया त्यांना या अडचणीतून बाहेर काढा…’, असं म्हणत मुलीने अक्षय कुमार याचे पाय धरले. अभिनेत्याने मुलीकडे दुर्लक्ष न करता, टीमच्या एका व्यक्तीला फोन नंबर देण्यास सांगितलं. त्यानंतर मुलगी अभिनेत्याचे पाय धरु लागली…

सध्या अभिनेत्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेकांनी अभिनेत्याचं कौतुक देखील केलं. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सलमान खान आणि अक्षय कुमार कायम लोकांच्या मदतीसाठी धावत असतात..’, तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अक्षय कुमार… तू उत्तम काम केलं आहेस…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणाच्या मदतीसाठी पुढे येणं यालाच हिरोपंती म्हणतात…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अक्कीनं मन फार मोठं आहे…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय कुमार याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.