‘तिच्या तोंडातून खूप वास’, बॉलिवूड अभिनेत्रीच्या तोंडातून दुर्गंधी येत होती; रोमँटिक सीनवेळी बॉबी देओल वैतागला

एका चित्रपटात बॉबी देओलला एका अभिनेत्रीसोबत रोमॅंटीक सीन शूट करताना प्रचंड त्रास होत होता तसेच त्याला तो वैतागला होता कारण त्या अभिनेत्रीच्या तोंडातून दुर्गंधी येत होती. त्याने स्वत: हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे.

तिच्या तोंडातून खूप वास, बॉलिवूड अभिनेत्रीच्या तोंडातून दुर्गंधी येत होती; रोमँटिक सीनवेळी बॉबी देओल वैतागला
Bobby Deol Shocking Revelation,Bad Breath Ruined Romantic Scene with Manisha Koirala
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 15, 2025 | 7:56 PM

बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या शुटींग दरम्यान अनेक किस्से घडत असतात. विशेषत: अभिनेता आणि अभिनेत्रीला एकमेकांसोबत रोमँटिक सीन करायचा असतो, किंवा कोणता इंटीमेट सीन करायचा असतो तेव्हा त्यांना अनेक गोष्टींसोबत तडजोड करावी लागते. कारण इंटीमेट सीन हे शुट करण्यासाठी फार अवघड असतात.

रोमॅंटीक गाण्याच्या शुटींगदरम्यान घडलेला विचित्र प्रसंग 

हे सीन शूट करतेवेळी अनेक विचित्र घटना घडत असतात. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलाखतींमध्ये देखील त्यांना आलेले विचित्र अनुभव सांगितले आहेत. असाच एक किस्सा अभिनेता बॉबी देओलसोबतही घडला आहे. त्याने हा प्रसंग त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. एका रोमॅंटीक गाण्याच्या शुटींगदरम्यान अभिनेत्रीच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे तो वैतागला होता. त्यामुळे त्याला रोमॅंटीक सीन शुट करता आला नाही. शेवटी त्याला याबाबत दिग्दर्शकाकडे तक्रार करावी लागली.

अभिनेत्रीच्या तोंडातून दुर्गंधी येत होती 

हा प्रसंग घडला होता 1990 मध्ये आलेला त्याचा ‘गुप्त’ चित्रपट. या चित्रपटात, अभिनेत्याने काजोल आणि मनीषा कोइराला या दोन अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ज्या अभिनेत्रीसोबत त्याला काम करण्यास त्रास होत होता तो ती अभिनेत्री म्हणजे मनीषा कोइराला. ‘बेचानियां’ या गाण्याचं शुटींग सुरु असताना त्यात त्याचे आणि मनिषाचे अनेक क्लोज आणि रोमॅंटीक सीन होते पण मनिषाच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याने बॉबीला रोमॅंटीक सीन शुट करणे शक्य नव्हते.


अभिनेत्रीच्या तोंडातून दुर्गंधी का येत होती? 

हा प्रसंग सांगताना म्हणाला की, “माझं तिच्याशी चांगलं जमलं, पण आमची कधीच मैत्री झाली नाही. गुप्तच्या ‘बाचेनियां’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान, तिला तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणायचा होता आणि नंतर माझी हनुवटीवर तिला बाईट घ्यायचा होता. पण तिने तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणताच मला तिच्या तोंडातून एक विचित्र वास येत होता. सीनच्या अगदी आधी तिने कांदा अन् चना चाट खाल्ला होता. शेवटी मी तो सीन केला पण मला आश्चर्य वाटलं की मी तो सीन कसा करू शकलो कारण त्यावेळी माझ्या मनात अजिबात ते करण्याची इच्छा नव्हती”

बॉबी देओलने मनिषासोबतचा रोमॅंटीक सीन शुट करण्याच्या अनुभव सांगत तो सर्वात विचित्र आणि न विसरता येणारा किस्सा म्हणून सांगितल. पण काजोल, मनिषा आणि बॉबी देओलचा गुप्त हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटाने बक्कळ कमाई केली.