शेकहॅंड करण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेचा हात पकडला अन् जोरात झटकला; जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
जया बच्चन यांचे पापाराझींवर, चाहत्यांवर चिडण्याचे व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्याच वयाची समवयस्कर महिला त्यांच्याशी बोलायला आली तेव्हा त्या तिच्यावर चिडल्या तिचा हात धरून तिला ढकललं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

जया बच्चन त्यांच्या चाहत्यांसोबत, पापाराझींसोबत वागण्याच्या सवयींमुळे, त्यांच्या रागीट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा पापाराझी किंवा इतर लोकांवर ओरडताना आणि भडकताना पाहिले गेले आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ व्हायरलही झाला ज्यात त्यांनी दिल्लीत संसदेच्या आवारात एक व्यक्तीला ढकललं होतं. त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला जया बच्चन यांनी त्यांना जोरात धक्का दिला आणि त्याच्यावर ओरडल्या. त्यांचं हे वागणं अनेकांना खटकलं असून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा जया बच्चन यांच्या अशा वागण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. ट्रोलही केलं आहे.
महिलेचा हात धरून फटकारल्याचा जया बच्चन यांचा व्हिडीओ
अशापद्धतीने त्यांनी चाहत्यांवर चिडणं, धक्का देणं हे पहिल्यांदाच घडलं नाही. तर याआधी देखील त्यांनी बऱ्याचदा चाहत्यांना याबाबत फटकारलं आहे, ओरडल्या आहेत आणि धक्काही दिला आहे. संसदेच्या आवारात एक व्यक्तीला ढकलल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे बरेच व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. आता त्यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेतला आहे. यादरम्यान त्यांच्याच वयाच्या एका महिलेवर रागवताना दिसत आहेत. त्यांनी त्या महिलेचा हात झटकलेलाही दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या महिलेनं एक फोटो मागितल्यामुळे त्या रागावल्या.
फोटो काढल्याबद्दल जया त्या पुरुषावर देखील चिडल्या
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एक वृद्ध महिला जया बच्चन यांच्याकडे येते आणि त्यांच्या हात लावून त्यांना मॅम म्हणून बोलावते. तेव्हा जया बच्चन या मागे वळतात. तेव्हा एक पुरूष जो कदाचित त्या वृद्ध महिलेसोबत होता तो त्याच्या मोबाईल कॅमेऱ्याने दोघींचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ती महिला हात मिळवण्यासाठी जया यांच्याकडे येते तेव्हा मात्र जया त्या महिलेचा हात जोरात झटकलं आणि तिच्या हाताला धरून बाजूला ढकललं. तसेच फोटो काढल्याबद्दल जया त्या पुरुषावर देखील चिडल्या. त्यांचं हे वागणं पाहून त्यांच्यासोबत असलेल्या अभिनेत्रींनाही थोडं विचित्र वाटलं.
View this post on Instagram
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जया यांना ट्रोल केलं
दरम्यान जया बच्चन यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा नेहमीप्रमाणे सर्वांनी त्यांच्या या वागण्यावर टीकाच केली आहे. मात्र यावेळी काहींनी समर्थनही केलं की, मनोज कुमार यांच्या निधनानंतर ती प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती त्यामुळे अशावेळी कोणी फोटो काढायला येतं का असं म्हणत काहींनी समर्थन केलं पण जया यांच्या नकार देण्याच्या, फटकून वागण्याच्या पद्धतीला मात्र ट्रोल केलं गेलं.
युजर्स काय म्हणाले?
एका युजरने लिहिले, “जया शांतपणे बोलू शकल्या असत्या.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “मला माफ करा, पण अंत्यसंस्कारात फोटो मागण्यासाठी योग्य जागा आहे का? तुम्ही असे कसे विचारू शकता?” तर, एका चाहत्याने लिहिले, “प्रार्थना सभेत फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बाहेर काढले पाहिजे. यावेळी, जया बरोबर आहे.”
