तुम्ही काय करताय?….सेल्फी घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जया बच्चन यांनी जोरात ढकललं अन्…
दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला जोरात ढकलले आणि ओरडले देखील. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्यांच्या वर्तनावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जया बच्चन यांनी अशा प्रकारे राग व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री तथा समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन हे नेहमीच मीडियावर किंवा चाहते फोटो घेत असताना त्यांच्यावर संतापताना दिसतात. अशाच पद्धतीने त्या एका व्यक्तीवर देखील संतापलेल्या दिसल्या. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर त्या जोरात ओरडल्या.
व्यक्तीला चांगलच फटकारलं
मंगळवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी थेट धक्का दिला आणि त्याच्यावर जोरात ओरडल्या. धक्का देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्का देत असताना, ‘तुम्ही काय करत आहात, हे काय आहे?’ असं म्हणत त्यांनी त्या व्यक्तीला चांगलच फटकारलेलं दिसत आहे.
सेल्फी काढणाऱ्या माणसाला ढकलून दिलं
जेव्हा विरोधी पक्षांचे सदस्य कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जमले होते, तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांच्याशी संबंधित एक घटना चर्चेत आली. समाजवादी पक्षाच्या खासदार कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या गेटवर पोहोचताच, त्या अचानक संतापल्या आणि तिथे उभ्या असलेल्या एका माणसाला ढकलून दिलं. हा माणूस तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. यावेळी तेथे अनेक खासदार उपस्थित होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी आणि लोकसभा सदस्या मीसा भारती देखील तेथे उपस्थित होत्या. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
#WATCH | Delhi: Samajwadi Party MP Jaya Bachchan scolded a man and pushed him away, while he was trying to take a selfie with her. pic.twitter.com/UxIxwrXSM0
— ANI (@ANI) August 12, 2025
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 32 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर ज्या पद्धतीने जया बच्चन ओरडल्या आणि ज्या पद्धतीने त्याला ढकललं ते कोणालाचा रुचलं नाही. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘कोणी इतका वाईट कसा असू शकतो. देव जयाजींचा अभिमान अशा प्रकारे मोडेल की त्यांना रडूही आवरता येणार नाही.” त्याच वेळी, दुसऱ्याने म्हटले की, ‘कोणी तिच्यासोबत सेल्फी का काढावा?
व्हिडिओवर जया बच्चन आणि पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘त्यांचे उच्चभ्रू, असभ्य आणि अहंकारी वर्तन पहा. ती एका पुरूषाला फक्त सेल्फी काढत होती म्हणून ढकलत आहे. आणि याजनतेसाठी लढण्याचा दावा करतायत.’ तथापि, या व्हिडिओवर राज्यसभा सदस्य जया बच्चन आणि पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
त्यांनी यापूर्वीही अनेकदा राग दाखवला आहे.
घटनेच्या वेळी समाजवादी पक्षाच्या खासदाराजवळ शिवसेना (यूबीटी) नेत्या प्रियंका चतुर्वेदी देखील उभ्या असलेल्या दिसल्या. बच्चन यांनी त्या व्यक्तीला ढकलताच, चतुर्वेदी मागे वळल्या आणि नंतर क्लबकडे चालत गेल्या. जया बच्चन यांनी सार्वजनिक ठिकाणी एखाद्यावर राग व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलिकडेच, संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान, राज्यसभा खासदाराने भाजप सदस्यांना अडवल्याबद्दल फटकारले होते आणि म्हणाल्या होत्या “एकतर तुम्ही बोला किंवा मी बोलते.”
