
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीने थेट पलटी मारली. अक्षय कुमार पत्नीसोबत विमानतळावरून जुहू येथील बंगल्याकडे निघाला होता. यादरम्यान अक्षय कुमार आणि त्याची पत्नी एकाच गाडीत होते. त्यांच्या गाडीच्या मागे त्यांच्या सुरक्षारक्षकांची कार होती. यादरम्यान एक मर्सिडीज कारचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि त्या मर्सिडीजने अगोदर ऑटोला धडक दिली. त्यानंतर ही कार अक्षय कुमार याच्या सुरक्षारक्षकांच्या कारला येऊन धडकली. पुढे अक्षय कुमार असलेल्या कारलाही थोडी धडक बसल्याची माहिती मिळतंय. मात्र, ज्यावेळी अक्षय कुमार याच्या सुरक्षारक्षकांच्या कारला मर्सिडीजने धडक दिली त्यावेळी ती थेट पलटी झाली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑटो चालकाला लगेचच मदत पोहोचवण्याचे काम करण्यात आले. अक्षय कुमार याने त्याच्या सुरक्षारक्षकांना ऑटो चालकाला रूग्णालयात लगेचच घेऊन जाण्याच्या सूचना दिल्याचीही माहिती मिळत आहे. या अपघातानंतर लोकांनी मोठी गर्दी झाली. अनेकांनी अपघातानंतर थेट व्हिडीओ देखील काढली. सध्या पोलिस या अपघात प्रकरणात तपास करत असल्याचे कळत आहे.
अजून तरी अपघाताप्रकरणी कोणत्याही प्रकारची एफआयआर दाखल करण्यात आली नाही. मर्सिडीज चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला की, कारण अजून काही वेगळे आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात अक्षय कुमार किंवा त्याच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. अक्षय कुमार बसलेल्या गाडीचे काही फार नुकसान झाले नसले तरीही त्याच्या सुरक्षारक्षकांच्या गाडीचे नुकसान झाल्याचे कळतंय.
अपघात झाल्यानंतर काही वेळात अक्षय कुमार तेथून निघून गेला. मात्र, त्याठिकाणी त्याचे सुरक्षारक्षक होते. ऑटो चालकावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात नक्की चुकी कोणाची याचा शोध घेतला जात आहे. अक्षय कुमार शूटिंग करून घरी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.