याला म्हणतात जिगरा, सतत धमक्यांनंतर अमिताभ बच्चन एकटेच पडले घराबाहेर, थेट गाडी चालवत..
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना मागील काही दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. त्यातच अमिताभ बच्चन यांनी न बोलताना धमक्या देणाऱ्यांना थेट उत्तर दिले. अमिताभ बच्चन यांचा खास व्हिडीओ पुढे आला. या व्हिडीओतून त्यांनी मोठा संदेश दिला.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वीच धमकी मिळाली. या धमकीला अमिताभ बच्चन यांनी साधी भिकही घातली नाही. त्यातच या धमक्यांचा आपल्याला काहीच परिणाम झाला नसल्याचे दाखवत बिग बींनी मोठा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अभिषेक बच्चन यालाही धमकी देण्यात आली. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अमिताभ बच्चन यांना लग्झरी गाड्यांची मोठी क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनने नवीन Land Rover Defender Octa खरेदी केली. त्यातच आता एक व्हिडीओ समोर आला. बिग बी स्वत:लेकीची नवीन कोरी एसयूव्ही घेऊन घरातून बाहेर पडले. अमिताभ बच्चन कॉपर रंगाची लॅंड रोवर डिफेंडर ऑक्टा घेऊन बाहेर घेऊन निघाले. अमिताभ बच्चन यांना बाहेर बघून लोकांनी त्यांना हात दाखवला.
फोटोग्राफर्सलाही हाय हॅलो करताना अमिताभ बच्चन दिसले. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे एकटेच कारमध्ये दिसून आले. त्यांच्यासोबत कारमध्ये इतर कोणीही दिसले नाही. लेकाची कार घेऊन अमिताभ बच्चन बाहेर पडले. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जीवे मारण्याच्या सतत धमक्या मिळत असतानाही नाचावर डिच्चून अमिताभ बच्चन घराबाहेर एकटेच पडले.
विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. गाडीच्या काच्या काळ्याही करण्यात आल्या नाहीत. अभिषेक बच्चन याने ही गाडी याच वर्षीच्या सुरूवातीला घेतली. ही गाडी दमदार असून याचा रंग खास आहे. बच्चन कुटुंबियांकडे हीच डिफेंडर कार नाहीये. अमिताभ बच्चन यांच्याकडे Defender 130 देखील आहे. यासोबतच त्यांच्याकडे Defender 110 आहे. डिफेंडर भारतातील सेलिब्रेटिंकडे जवळपास आहेत.
याचे खास फिचर्स आहेत. डिफेंडर ऑक्टा कंपनीची सर्वात पावरफुल कार आहे. एसयूव्ही सर्वात महागडी आहे. मागच्या वर्षीच ही कार भारतात लॉन्च झाली. ही अत्यंत खास कार आहे. डिफेंडर ऑक्टा लग्झरी लक्षात घेता याक लेदर 11.4 टचस्क्रीन, मिनी रेफ्रिजरेटर आणि प्रीमियल ओडिओ सिस्टम देखील आहे. भारतात डिफेंडर ऑक्टाची किंमत 2.62 कोटीपासून सुरू होते.