Bollywood Actor : फुटपाथवर चादर टाकून झोपला लोकप्रिय अभिनेता, अवस्था पाहून चाहते हैराण… नेमकं काय आहे प्रकरण?

Bollywood Actor : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर का आली फुटपाथवर झोपण्याची वेळ? अभिनत्याची अशी अवस्था पाहून चाहते हैराण... जाणून घ्या त्याच्यासोबत नेमकं झालं तरी काय?

Bollywood Actor : फुटपाथवर चादर टाकून झोपला लोकप्रिय अभिनेता, अवस्था पाहून चाहते हैराण... नेमकं काय आहे प्रकरण?
Sunil Grover
| Updated on: Jun 19, 2026 | 8:43 AM

Bollywood Actor : आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना पोट धरुन हसवणारा विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सुनील एखद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे चादर टाकून झोपलेला दिसत आहे. सुनील याला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सुनील फुटपाथवर आरामात झोपलेला दिसत आहे.. फुटपाथवर त्याने चादर टाकली आाहे आणि कोणत्याच व्हिआयपी ट्रीटमेंटशिवाय झोपला आहे… अभिनेत्याला असं पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील प्रश्न पडला आहे की, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

सोशल मीडिया फुटपाथवर झोपलेला व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने सुंदर असं कॅप्शन देखील लिहिलं आहे. व्हिडीओ पोस्ट करत सुनील ग्रोवर म्हणतो, ‘तेरे जमीन पर…’, सुनील याचा हा अंदाज चाहत्यांना प्रभावित करत आहे… तर अनेकांनी अभिनेत्याच्या साधेपणाचं कौतुक देखील केलं आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुनील याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

 

 

सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा अभिनेत्याने असं काही केलं आहे. सुनील असे मजेदार व्हिडीओ पोस्ट करण्यासाठीच ओळखला जातो… कधी रस्त्याच्या किनाऱ्यावर चहा बनवताना अभिनेता दिसतो, तर काधी भाजी विकताना दिसतो… आता नव्या व्हिडीओमध्ये तर अभिनेत्याने स्वतःच्या आलिशान घरातील मऊ गादी सोडून, फुटपाथवर एका चादरीवर झोपलेला दिसत आहे. अभिनेत्याच्या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षव देखील केला आहे.

सुनील ग्रोवर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याला कोणत्या ओळखीची गरज नाही. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सुनील, डॉ. महशूर गुलाटी आणि गुत्थी या भूमिकांमध्ये दिसला. यामुळे सुनील याला वेगळी ओळख मिळाली. फक्त कॉमेडी शोमध्येच नाही तर, त्याने अनेक सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ‘गजनी’, ‘जवान’, ‘भारत’, ‘बागी’, ‘हीरोपंती’ आणि ‘राधे’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत सुनील याने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

 

Follow Us