Maharashtra News LIVE: महाराष्ट्रात आज रिक्षा संपाची हाक, मुंबईसह राज्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता
राज्यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घ्या. घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स झटपट पहा.

LIVE NEWS & UPDATES
-
RTO अधिकाऱ्याने गोळी झाडून जीवन संपवल्याचे प्रकरण
पत्नीच्या तक्रारीवरून 4 जणांन विरुद्ध गुन्हा दाखल मुलगा आणि मुलाच्या सासऱ्याला पोलिसांनी केली अटक. मालमत्तेच्या वादातून हेमंत हेमाडे यांचा मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचा पत्नीचा आरोप. या छळाला कंटाळून सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून संपविली जीवन यात्रा. घटनेनंतर मुलगा यश हेमाडे भाग्यश्री हेमाडे प्रियंका खोपकर मल्लिकार्जुन उमदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.
-
पुणेकरांवर पाणी कपात लादून दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
पुणे शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांवर पाणी कपातीचा भार टाकला जात असताना, दुसरीकडे महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून, पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा संतप्त सवाल शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी उपस्थित केला आहे.
-
-
आज पहाटे कोंढवा, भाग्योदय नगर येथील इमारतीत 18 वाहनांना आग
पुण्यातील भाग्योदय नगर, कोंढवा येथील चार मजली इमारतीत तळमजल्यावरील पार्किंगमध्ये वाहनांना आग लागली असल्याची वर्दि नियंत्रण कक्षात प्राप्त होताच तात्काळ कोंढवा येथील तीन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. या आगीमध्ये १६ दुचाकी, १ तीनचाकी, १ चारचाकी वाहन जळाले असून लिफ्ट व इलेक्ट्रिक वायरिंगचे ही मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
-
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहितांसाठी राज्य सरकारकडून नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहितांसाठी राज्य सरकारकडून नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात. कामगार संहिता लागू झाल्यानंतर कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा, वेतनव्यवस्था आणि औद्योगिक संबंधांमध्ये स्पष्टता येणार. वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीविषयक संहितांचा समावेश. केंद्राच्या चार कामगार संहितांनुसार राज्य सरकार स्वतंत्र नियमावली तयार करत असून काही नियमांचे मसुदे यापूर्वीच जाहीर. वेतन, वेतन देण्याची पद्धत, वेतनातील कपात, समान वेतन, कामगार संघटनांची मान्यता आणि औद्योगिक वाद याबाबत तरतुदी निश्चित होणार. राज्यातील चारही कामगार संहितांच्या नियमावलीला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून येत्या महिनाभरात संहिता लागू करण्याची शक्यता.
-
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या (MSF) जवानांवर यंदा ३१ हल्ल्यांच्या घटना घडल्याचे समोर
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या (MSF) जवानांवर यंदा ३१ हल्ल्यांच्या घटना घडल्याचे समोर. या घटनांची गंभीर दखल घेत महामंडळाने अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. ३१ पैकी १३ हल्ले दखलपात्र, तर १८ अदखलपात्र गुन्ह्यांच्या श्रेणीत. २०२५ मध्ये जवानांवरील हल्ल्यांच्या २७ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. सार्वजनिक सेवा बजावताना जवानांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत महामंडळाने चिंता व्यक्त केली. हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करून जवानांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश.
-
-
मुंबई महापालिकेत अधिकारी बदल्यांवरून भाजपमध्ये नाराजी…सत्ताधारी विरुद्ध प्रशासन संघर्ष
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासन यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्यांवरून भाजपचे काही नगरसेवक नाराज झाले आहेत. प्रभागातील विकासकामांसाठी आपल्या पसंतीचे अधिकारी मिळावेत, अशी मागणी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने ही मागणी मान्य न केल्याने भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. या अगोदर आमदार अमित साठम आणि आमदार मिहीर कोटेजा यांना देखील या विषयाची माहिती या नगरसेवकांनी दिली आहे. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने नगरसेवक आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती.
महाराष्ट्रात आज रिक्षा संपाची हाक, मुंबईसह राज्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये रिक्षा सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या (MSF) जवानांवर यंदा ३१ हल्ल्यांच्या घटना घडल्याचे समोर. या घटनांची गंभीर दखल घेत महामंडळाने अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. ३१ पैकी १३ हल्ले दखलपात्र, तर १८ अदखलपात्र गुन्ह्यांच्या श्रेणीत. २०२५ मध्ये जवानांवरील हल्ल्यांच्या २७ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. सार्वजनिक सेवा बजावताना जवानांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत महामंडळाने चिंता व्यक्त केली. हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करून जवानांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश.
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहितांसाठी राज्य सरकारकडून नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात. कामगार संहिता लागू झाल्यानंतर कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा, वेतनव्यवस्था आणि औद्योगिक संबंधांमध्ये स्पष्टता येणार. वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीविषयक संहितांचा समावेश.
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासन यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्यांवरून भाजपचे काही नगरसेवक नाराज झाले आहेत. प्रभागातील विकासकामांसाठी आपल्या पसंतीचे अधिकारी मिळावेत, अशी मागणी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली होती.
Published On - Nov 23,2026 8:20 AM
