AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांच्यामुळे वाढले भाजपाचे टेन्शन, अखिलेश यादव यांचा मोठा डाव, निवडणुकीत..

उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आहेत. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपाविरोधात मोठा डाव खेळण्याच्या तयारीत अखिलेश यादव आहेत. ज्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक जाऊ शकते.

अभिजीत दिपके यांच्यामुळे वाढले भाजपाचे टेन्शन, अखिलेश यादव यांचा मोठा डाव, निवडणुकीत..
Abhijit Deepak Akhilesh Yadav
| Updated on: Nov 23, 2026 | 7:50 AM
Share

उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी युती म्हणून या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट आहे. सोमवारी दोन्ही पक्षात एकमेकांना किती जागा सोडणार यावर बैठक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने दोन्ही पक्ष एकमेकांना सन्मानजनक जागा सोडतील, अशी आशा व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे नेते प्रमोद तिवारी यांच्या घरी ही बैठक होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करण्यासही सुरूवात केली. लवकरात लवकर जागा वाटप व्हावे, ही दोन्ही पक्षाची इच्छा आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीची सत्ता येण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. काँग्रेस पक्षाच्या सल्लागारांचे म्हणणे आहे की, जास्त मतदार संघात विजय आवश्यक आहे. पण दोन्ही पार्टीने सन्मानजनक सीट द्यायला हव्यात.

वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की, ही निवडणूक काँग्रेसपेक्षा कितीतरी जास्त पट समाजवादी पार्टीसाठी महत्वपूर्ण आहे. 2017 ची निवडणूक काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने एकत्र येत लढवली होती. त्यावेळी काँग्रेसला 105 सीट मिळाली होती. या बैठकीला दोन्ही पक्षातील महत्वपूर्ण नेते उपस्थित राहणार आहेत. अखिलेश यादव यांच्याकरिता ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे.

अखिलेश यादव यांनी भाजपाला उत्तर प्रदेशमधून हद्दपार करण्यासाठी मोठा डाव खेळण्याचा प्लान तयार केला. 2027 च्या विधानसभेसाठी चक्के ते अभिजीत दिपके यांची पार्टी कॉकरोच जनता पार्टीची मदत घेण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत सीजेपीच्या प्रमुख चेहऱ्याला सहभागी करून घेण्याचा अखिलेश यादव यांचा डाव आहे. आम आदमी पार्टीचीही मदत घेतली जाणार आहे.

सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासोबतच आशुतोष रांकाही मोठा चेहरा आहे. आता अभिजीत दिपके उत्तर प्रदेशातील निवडणुकीत अखिलेश यादव यांची मदत करणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अभिजीत दिपके यांनी जर भाजपाविरोधात या निवडणुकीत इंडिया आघाडीची मदत केली तर भाजपासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. उत्तर प्रदेशच्या घडामोडींकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!