AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हात जोडून गोविंदाच्या पत्नीने केली विनंती, म्हणाली, माझ्याकडे परत ये चीची…माझ्या इतके प्रेम कोणी नाही…

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनिता आहूजा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. त्यामध्येच गोविंदाच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

हात जोडून गोविंदाच्या पत्नीने केली विनंती, म्हणाली, माझ्याकडे परत ये चीची...माझ्या इतके प्रेम कोणी नाही...
Govinda and Sunita Ahuja
| Updated on: Aug 23, 2025 | 10:52 AM
Share

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा घटस्फोट होणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामध्येच काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, गोविंदाची पत्नी सुनिता आहूजा यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील केलाय. मागील काही दिवसांपासून दोघे विभक्त देखील राहत होते. आता गोविंदाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये गोविंदा हा गायब आहे. गोविंदाच्या पत्नीने 5 डिसेंबर 2024 रोजी बांद्रातील कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. गोविंंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटासाठी मराठी अभिनेत्री कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचे अफेअर सुरू असल्याचा खुलासा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला.

सुनिता आहूजा या मागील काही दिवसांपासून गोविंदाबद्दल काही विधाने करताना दिसल्या ज्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट झाले. आता त्यामध्येच सुनिता आहूजा यांची एक मुलाखत चर्चेत आलीये. त्या मुलाखतीत त्या एकप्रकारे हात सोडून गोविंदाला परत येण्यास सांगताना दिसत आहेत. हेच नाही तर माझ्या इतके प्रेम गोविंदावर दुसरे कोणीही करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

मुलाखतीत सुनिता आहूजा यांनी म्हटले की, गोविंदाला भूक कधी लागते, त्याला कधी अॅसिडिटी होते, त्याला कधी काय पाहिजे हे फक्त मला माहिती आहे. मी जितके गोविंदाला ओळखते तितके त्याला कोणीच ओळखू शकत नाही. मी त्याच्यावर मनातून प्रेम करते. माझ्या इतके प्रेम त्याच्यावर दुसरे कोणीच करू शकत नाही. सुनिता आहूजा यांनी पुढे म्हटले की, मला 90 दशकातील गोविंदा आवडतो. जुनावाला..

सुनिता यांनी हात जोडून म्हटले की, परत ये गोविंदा तू…माझा चीची तू खरोखरच परत ये…माझ्याजवळ ये माझा चीची….या मुलाखतीतून गोविंदाला मोठा संदेश हा सुनिता यांनी दिला. सुनिता यांनी अगदी स्पष्ट केले की, माझ्या इतके त्याच्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही. हाऊटरफ्लाईच्या रिपोर्टनुसार, सुनिता आहूजा यांनी हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार, 13(1)(i),(ia),(ib) प्रमाणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, यावर अजून तरी गोविंदा किंवा सुनिता आहूजा यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आले नाहीये.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा