अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर

Pankaj Tripathi Brother Attack : प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते पंकज तिवारी यांच्या भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर आलं आहे..

अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला... पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
Pankaj Tripathi
| Updated on: Jun 22, 2026 | 10:23 AM

Pankaj Tripathi Brother Attack : प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे मोठे भाऊ बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर प्राणघातक हल्लाक करण्यात आला आहे… काही अज्ञात हल्लेखोरांनी बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली… तेव्हा तेथील डॉक्टरांनी बिजेंद्र यांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितलं. घटलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे…

ही धक्कादायक घटना मधोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलसंड गावात घडल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामुळे गावात घबराट पसरली. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने गोपाळगंज सदर रुग्णालयात नेले, जिथे त्यांना प्रथमोपचार देण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पाटण्याला हलवण्यात आले.

पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचं कारण समोर

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजेंद्र यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही, पोलीस सर्व पैलूंचा विचार करून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माधोपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटली असून त्याला पकडण्यासाठी सतत छापे टाकले जात आहेत. आरोपीला लवकरच अटक केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता याप्रकरणी पुढे काय होत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह

दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे… सांगायचं झालं तर, पंकज त्रिपाठी आज मोठे स्टार असले तरी, त्यांचं कुटुंब लाईमलाईटपासून दूर असतं.

Follow Us