रितेश देशमुख भडकला, छोट्या पुढारीने हात जोडून मागितली माफी, अभिनेता धमकी देत थेट म्हणाला, घराच्या बाहेर…

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट करत आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुख याचा हा अंदाज चाहत्यांना जबरदस्त आवडतो. मात्र, नुकताच बिग बॉसच्या घरात असे काही घडले की, सर्वचजण हैराण झाले. रितेश देशमुख हा चांगलाच भडकल्याचे बघायला मिळाले.

रितेश देशमुख भडकला, छोट्या पुढारीने हात जोडून मागितली माफी, अभिनेता धमकी देत थेट म्हणाला, घराच्या बाहेर...
Riteish Deshmukh
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 1:27 PM

बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी रितेश देशमुख हा घरातील अनेक सदस्यांचा क्लास लावताना दिसला. जान्हवी किल्लेकर हिला रितेश देशमुख याने मोठी शिक्षा सुनावलीये. आता पुढील काही दिवस जान्हवीला जेलमध्ये राहावे लागेल. फक्त हेच नाही तर जान्हवीला भाऊच्या धक्क्याला देखील बसताना येणार नाहीये. जान्हवीने पॅडी कांबळे याच्याबद्दल हैराण करणारे विधान केले. ज्यानंतर लोकांमध्ये मोठा रोष बघायला मिळाला. रितेश देशमुख याने निकी तांबोळी हिला काही व्हिडीओ दाखवले आहेत. या व्हिडीओमध्ये निकी तांबोली हिच्या मागे तिच्याच टीममधील लोक बोलताना दिसत आहेत.

निकी तांबोळी हिने तिच्या टीममधील लोकांना आता थेट मोठे चॅलेज देऊन टाकले आहे. बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये नुकताच असा एकप्रकार घडला की, रितेश देशमुख याचा राग बघायला मिळाला. हेच नाही तर रितेश देशमुख हा रागामध्ये थेट बिग बॉसचा मंच सोडून जाताना देखील दिसला. त्याचे कारणही अत्यंत मोठे आहे. रितेश देशमुख याचा राग पाहून घरातील सर्व सदस्य हेैराण झाल्याचे बघायला मिळाले.

धनश्याम दरोडे अर्थात छोटा पुढारी याला एक खास टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये त्याला घरातील सदस्यांना काही टॅग द्यायची होती. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मागे कोण फिरतो असा एक टॅग होता तो घरातील एका सदस्याला द्यायचा होता. मात्र, छोटा पुढारी थेट म्हणाला की, हे मी कोणालाच देऊ शकत नाही. यावर रितेश देशमुख म्हणाला की, धनश्याम तुम्हाला हे द्यावे लागेल.

धनश्याम तो टॅग कोणाला देत नसल्याने रितेश देशमुख चांगलाच चिडला. रितेश देशमुख याचे न ऐकल्याने तो भडकला. हेच नाही तर रितेश म्हणाला की, हा टॅग दे नाही तर घराच्या बाहेर निघ आणि तुला निघावे लागले. यावेळी घनश्याम हा हात जोडून रितेश देशमुख याची माफी मागताना दिसला. सर माझे चुकले मला माफ करा असेही धनश्याम याने म्हटले.

त्यानंतर रितेश देशमुख याने थेट म्हटले की, हा टास्क इथेच संपला आहे. यानंतर सतत माफी मागताना धनश्याम हा दिसला. रितेश देशमुख छोट्या पुढारीला म्हणाला हे नाटक बंद करा. पुढे रितेश देशमुख याने निर्मात्यांना देखील थेट म्हटले की, हे दाखवू नका…कट करा…पहिल्यांदाच रितेश देशमुख बिग बॉसच्या मंचावर अशाप्रकारेच चिडताना दिसतोय.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.