AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | अनेक वर्षांनंतर ऐश्वर्याचं नाव घेताच फुलला सलमान खानचा चेहरा; व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल…

आजही ऐश्वर्या राय हिच्या आठवणीत जगतोय सलमान खान? एक्स गर्लफ्रेंडचं नाव घेताच भाईजानचा फुललेला चेहरा, अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया आणि बरंच काही...

Salman Khan | अनेक वर्षांनंतर ऐश्वर्याचं नाव घेताच फुलला सलमान खानचा चेहरा; व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
| Updated on: Jun 05, 2023 | 1:10 PM
Share

मुंबई | बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या अफेअरच्या चर्चा रंगत असतात. अशात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत असेल तर, चाहत्यांना देखील सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. सलमान – ऐश्वर्या यांचं ब्रेकअप होवून आज अनेक वर्ष झाली आहेत, तरी देखील अनेक कार्यक्रमांमध्ये भाईजानला एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या हिच्याबद्दल विचारलं जातं. शिवाय दोघांचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार असल्यामुळे सलमान आणि ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. दरम्यान, आता देखील एक सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा व्हायरल होणार व्हिडीओ २०१८ मधील आहे. जेव्हा सलमान खान ‘लव्हयात्री’ सिनेमाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होता. तेव्हा एक महिला पत्रकार म्हणाली, ‘माझं नाव ऐश्वर्या आहे…’ तेव्हा ऐश्वर्याचं नाव ऐकताच सलमानचा चेहरा फुलला आणि हसला… पुढे महिला पत्रकार भाईजानला म्हणते, ‘माझ्याकडे पाहा आधी…’ पण सलमान खान नजर चुकवत म्हणतो.. ‘हा… बोला..’ सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

१९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम फुललं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं. शिवाय तेव्हा अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याला चाहत्यांनी फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील प्रचंड प्रेम दिलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by HT-7 (@ht.seven_)

विभक्त झाल्यानंतर ऐश्वर्याने सलमान खानवर आरोप करत ब्रेकअपचं कारण सांगितलं. ऐश्वर्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं की, स्वतःला संकटापासून दूर केलं आहे, कारण २००१ मध्ये सलमान खान मध्यरात्री अभिनेत्रीच्या घरी आला आणि वाद करण्यास सुरुवात केली. तेव्हा ऐश्वर्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देखील केली. एवढंच नाही तर, अभिनेत्री घराबाहेर येत नसल्यामुळे सलमानने स्वतःला संपवण्याची देखील धमकी दिली.

आता ऐश्वर्या अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी देखील आहे. बच्चन कुटुंबाच्या नातीचं नाव आराध्या असं आहे. आराध्या देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी किड आहे. तिचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय आराध्याला अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यासोबत स्पॉट केलं जातं.

Follow Us
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.