
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून अनेकांची मदत करत आहे. अभिनेत्याच्या याच स्वभावामुळे देशभरातील जनतेचं सोनू सूद याला प्रेम मिळत आहे. अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला न्याय देणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांचा ‘हिरो’ झाला आहे. सोनूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोनू सूद याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत गप्पा मारण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सोनू सूदने कोरोनाच्या काळात अनेकांची मदत केली. ज्यामुळे अभिनेता प्रसिद्धीझोतात आला. आता अभिनेत्याने एका पाकिस्तानी चाहत्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. अशात अभिनेत्याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनू सूद याने मंगळवारी स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत चाहच्यांसोबत गप्पा मारल्या. यावेळी अभिनेत्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. सोनू सूदबद्दल बोलताना एक अभिनेत्याचा एका म्हणाला – या देशातील प्रत्येक नागरिकाने तुम्हाला कोरोनाच्या काळातील देवदूताच्या रूपात लक्षात ठेवलं आहे. तुम्ही लोकांची मोफत सेवा केली. तुम्ही या देशाचे खरे हिरो आहात…. चाहत्याच्या ट्विटचं उत्तर देत अभिनेता म्हणाला,’मी फक्त एक निमित्त होते आणि कायम राहीन.’
Big hug bro https://t.co/2d43MSeNHe
— sonu sood (@SonuSood) June 13, 2023
तर अन्य एका चाहत्याने सोनू सूदवर असलेलं प्रेम व्यक्त केलं.. ट्विट करत चाहता म्हणाला, ‘मी पाकिस्तानी आहे आणि सर मी तुमचा फार मोठा फॅन आहे..’ जेव्हा सोनू सूदने त्याच्या पाकिस्तानी चाहत्याचं ट्विट वाचलं तेव्हा चाहत्याच्या ट्विटवर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिला आहे. अभिनेता म्हणाला, हार्ट इमोजी शेअर करताना सोनू सूद म्हणाला- ‘बिग हग ब्रो.’ सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा आहे…
सोनू भाई किस चक्की का आटा खाते हो हमारी बॉडी ऐसे कब बनेगी pic.twitter.com/2afGoztLMs
— Narayan Vyas (@NarayanCyclist) June 13, 2023
दरम्यान, एका चाहत्याने अभिनेत्याचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत चाहता म्हणाला, ‘सोनू भाई, किस चक्की का आटा खाते हो… आमची बॉडी कधी होणार तुझ्यासारखी…’ याच उत्तर देत अभिनेता विनोदी अंदाजात म्हणाला, ‘आटा खात नाही… म्हणून इतका फिट आहे…’ सध्या सर्वत्र सोनू सून आणि अभिनेत्याने चाहत्यांना दिलेल्या किंमती वेळीची चर्चा रंगत आहे…
सोनू सून याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच साउथ सिनेमा ‘तमिलरासन’ आणि बॉलिवूड ‘फतेह’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते सध्या अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.