Border 2 प्रदर्शित होताच सनी देओल याला मोठा धक्का… अनेक ठिकाणी सिनेमावर बंदी… नेमकं काय आहे कारण?

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बॉर्डर 2' सिनेमाची चर्चा रंगली आहे. पण सिनेमाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेता सनी देओल आणि सिनेमातील इतर कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सिनेमावर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. काय आहे कारण?

Border 2 प्रदर्शित होताच सनी देओल याला मोठा धक्का... अनेक ठिकाणी सिनेमावर बंदी... नेमकं काय आहे कारण?
Border 2
| Updated on: Jan 26, 2026 | 3:29 PM

Border 2: ‘बॉर्डर’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘बॉर्डर’ सिनेमाच्या अनेक वर्षांनंतर ‘बॉर्डर 2’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉर्डर 2’ सिनेमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ‘बॉर्डर 2’ सिनेमा 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमली. सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु असताना, अभिनेता सनी देओल आणि सिनेमातील इतर कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सिनेमावर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या काही सिनेमांवर देखील काही देशांनी बंदी घातली होती. तर आता ‘बॉर्डर 2’ सिनेमावर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, ओमान, कतार, कुवैत, बहरीन, सौदी अरब आणि युएई या देशांमध्ये ‘बॉर्डर 2’ सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धांवर आधारित सिनेमांवर काही देशांमध्ये बंदी घालण्यात येते. गल्फ देशांमध्ये सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.

‘बॉर्डर 2’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘बॉर्डर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत असंख्य चाहते होते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर देखील अनेकांचं लक्ष आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने 36.5 कोटींचा आकडा गाठला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 54.5 कोटींचा गल्ला जमा केला असून चौथ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी दुपारी 2.30 वा. पर्यंत सिनेमाने 19.44 कोटींची कमाई केली आहे. म्हणजे सिनेमाने आतापर्यंत 140.44 कोटींची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा रंगली आहे.

 

 

‘बॉर्डर 2’ हा 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा सिक्वेल आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं आहे. सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सनी देओल याच्या वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंग, मेधा राणा आणि सोनम बाजवा यांच्यासह अनेक कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनमाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला 5 पैकी 4.5 स्टार्स दिले आहेत.