Sierra EV सोबत भारतात लाँच होणार या 4 नव्या इलेक्ट्रिक कार, पाहा कोणती EV तुमच्यासाठी बेस्ट
जर तुम्ही येणाऱ्या काळात नवीन इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर काही अपकमिंग EVs तुमच्यासाठी शानदार पर्याय ठरु शकतात. चला या कारच्या फिचरची माहिती घेऊया....

भारतात इलेक्ट्रीक कारची मागणी वेगाने वाढली आहे. यामुळे ऑटो कंपन्यांनी नवीन इलेक्ट्रीक कारच्या मॉडेल्सना लाँच करण्याची तयारी केली आहे. या वर्षी Tata Sierra च्या सह एकूण चार नव्या इलेक्ट्रीक कारना भारतात उतरवण्याची तयारी केली आहे. खास बाब म्हणजे यात मारुती सुझुकी आणि टोयटा कंपन्या देखील त्यांची इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची तयारी केली आहे. जेव्हा टाटा मोटर ( Tata Motors) आपल्या पोर्टफोलिओला मजबूत केले आहे. रेंज, फिचर्स आणि डिझाईनच्या बाबतीत या सर्व कार दमदार आहेत.
Maruti Suzuki e Vitara
Maruti Suzuki e Vitara ही भारतात मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV असणार आहे. या कारला साल 2026 च्या पहिल्या तिमाहीत लाँच केले जाऊ शकते. या कारमध्ये 49 kWh आणि 61 kWh च्या दोन बॅटरीचे ऑप्शन मिळणार आहे. मोठी बॅटरीसह ईव्ही एकदा चार्ज केले तर सुमारे 543 किलोमीटरपर्यंत धावू शकतील. ही कार सुमारे 172 bhp पॉवर जनरेट करते आणि डेल्टा, जेटा आणि अल्फा सारख्या तीन ट्रीम्समध्ये उपलब्ध होईल. बऱ्याच काळापासून ग्राहक या कारची वाट पाहात आहेत.
Toyota Urban Cruiser Ebella
टोयोटा अर्बन क्रुझर एबेला मारुती ई-व्हीटारावरच आधारित आहे. परंतू हीचे डिझाई जास्त शार्प आणि प्रीमियम असणार आहे. यात देखील 48.8 kWh आणि 61.1 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी कमाल 543 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. ही टोयोटाची पहिलीच इलेक्ट्रीक कार असणार आहे. ज्यामुळे कंपनी आता ईव्ही सेगमेंटमध्ये आपले पाऊल ठेवणार आहे..
Tata Sierra EV आणि Tiago EV Facelift
Tata कंपनी तिची आयकॉनिक Sierra कारला इलेक्ट्रीक अवतारात लाँच करत आहे. त्यामुळे Tata Sierra EV मध्ये AWD चा पर्याय मिळू शकतो. आणि यात 55 वा 65 kWh क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.या कारची रेंज सुमारे 500 किमी असण्याची शक्यता आहे. तसेच साल 2026 मध्येच टाटा टीएगो ईव्हीचा फेसलिफ्टचे व्हर्जन देखील येणार आहे. ज्याचा नवा लुक आणि डिजिटल डॅशबोर्ड असणार आहे. मात्र, बॅटरी आणि रेंज आधीसारखीच असणार आहे.
Tata Avinya Sportback
Tata Avinya Sportback ही टाटा कंपनीची सर्वात हाय-टेक आणि प्रीमियम इलेक्ट्रीक कार असणार आहे.यास साल 2026 च्या अखेरीस लाँच केले जाऊ शकते. आणि या कारची रेंज 600 किलोमीटरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
