तो मला मध्यरात्री फोन करायचा आणि हॉटेलमध्ये…, इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांसोबत देखील घडलेत नको ते प्रकार, मोठा खुलासा
Aftab Shivdasani : तो मला मध्यरात्री फोन करायचा आणि हॉटेलमध्ये..., इंडस्ट्रीमध्ये फक्त अभिनेत्रीच नाही तर, अभिनेत्यांसोबत देखील घडलेत नको ते प्रकार, प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

Aftab Shivdasani : इंडस्ट्री मुलींसाठी योग्य नाही… इंडस्ट्रीमधील लोकं मुलींसोबत गैरवर्तन करतात… झगमगत्या विश्वात मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं…, चांगल्या भूमिकेसाठी मुलींना तडजोड करावी लागते… असं अनेकदा आपण ऐकलं असेल… पण असं फक्त अभिनेत्रींसोबतच नाही तर, अभिनेत्यांसोबत देखील घडत असतं. पूर्वी खासगी आयुष्यातील गोष्टी सेलिब्रिटी मोकळेपणाने सांगत नव्हते. पण आता बदलत्या काळानुसार सेलिब्रिटी व्यक्त होऊ लागले आहेत. ज्यामुळे झगमगत्या विश्वातील काळं सत्य देखील लोकांना कळू लागलं… सांगायचं झालं तर, अभिनेता आफताब शिवदासानी याने देखील इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या काळात नको त्या गोष्टींचा सामना केला आहे.
आफताब याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावल्या आणि चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. पण हे अभिनेत्यासाठी बिलकूल सोपं नव्हतं. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आफताब याने कास्टिंग काऊचचा देखील सामना केला आहे. करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांत आफताब याने कास्टिंग काऊचचा सामना केला. इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध व्यक्ती सतत अभिनेत्याला फोन कारायचा आणि हॉटेलमध्ये यायला सांगायचा…
View this post on Instagram
आफताब याने ‘यारों की बात’ या शोमध्ये घडलेल्या घटनेचा मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याने सांगितलं की, इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा त्याला रात्री उशिरा वारंवार फोन करून हॉटेलमध्ये येण्यास सांगत असायचा. अभिनेता म्हणाला, ‘करीयरच्या सुरुवातीला मी मॉडेलींग आणि म्यूझिक व्हिडीओंमध्ये अभिनय करायचो… याचदरम्यान मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला… इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्ती मला सतत फोन करायचा आणि हॉटेलमध्ये यायला सांगायचा…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘त्या व्यक्तीने मला सिनेमात काम देण्याचं वचन दिलं. पण तो सतत मला फोन करायचा. त्याचा फोन आला ती मला अस्वस्थ व्हायचं…’ त्यानंतर अभिनेत्याने संबंधित व्यक्तीचा फोन आल्यानंतर उचलणं बंद केलं… असं फक्त आफताब याच्यासोबतच नाही तर, अनेक सेलिब्रिटींसोबत झालं आहे.
आफताब याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच, ‘वेलकम टू द जंगल’, ‘मस्ती 4’, ‘कसूर 2’ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्याने 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मस्त’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात आफताब याच्यासोबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होती.
