लग्नापूर्वीच्या शरीरसंबंधांवर ऐश्वर्या राय हिचे मोठे विधान, बच्चन कुटुंबियांची सून म्हणाली, लग्नाच्या अगोदर…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्याने नुकताच लग्नाच्या अगोदर शरीर संबंध योग्य की अयोग्य यावर मोठे भाष्य केले आहे.

लग्नापूर्वीच्या शरीरसंबंधांवर ऐश्वर्या राय हिचे मोठे विधान, बच्चन कुटुंबियांची सून म्हणाली, लग्नाच्या अगोदर...
Aishwarya Rai
| Updated on: Nov 01, 2025 | 12:19 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे नाव कायमच चर्चेत राहणारे आहे. ऐश्वर्याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा असून हीट चित्रपट  बॉलिवूडला दिली आहेत. ऐश्वर्या बॉलिवूडची टॉप अभिनेत्री राहिली आहे. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्याचे खासगी आयुष्य चर्चेत होते. अभिषेकसोबत लग्न होण्यापूर्वी ऐश्वर्या ही सलमान खानला डेट करत होती. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनला एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे. दोघेही आराध्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता नुकताच ऐश्वर्या राय हिने सार्वजनिक प्रेमसंबंध आणि विवाहपूर्व शारीरिक संबंध यावर मोठे भाष्य करत आपले मत मांडले आहे.

भारतात प्रेम आणि आपुलकी सार्वजनिकरित्या का प्रदर्शित केली जात नाही? यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ऐश्वर्या राय हिने म्हटले की, मुळात म्हणजे ही अत्यंत खासगी भावना आहे. आपल्याकडे कधीच रस्त्यावर किस वगैरे घेतली जात नाही. मुळात म्हणजे आपल्याकडे खासगी भावना सार्वजनिक रित्या अजिबातच दाखवल्या जात नाहीत किंवा त्याबद्दल साधे बोलले पण जात नाही.

पुढे बोलताना ऐश्वर्या रायने म्हटले की, लग्नाच्या अगोदर असो किंवा लग्नाच्यानंतर कोणासोबतही शारीरिक संबंध ठेवणे ही एक वैयक्तिक बाब आहे, भारतात हे सर्व निषिद्ध आहे. भारतीय जीवनशैलीशी सुसंगत असे विधान करताना ऐश्वर्या राय ही दिसली. लग्नापूर्वी किंवा त्यानंतर शारीरिक संबंध ठेवावेत की नाही हे ज्याच्या त्याच्या भावनांवर अवलंबून असते. पुढील सर्व विचार करून हा निर्णय घेतला पाहिजे.

पहिल्यांदाच याबद्दल बोलताना ऐश्वर्या राय ही दिसली आहे. ऐश्वर्याने लग्नापूर्वी आणि नंतरच्या शारीरिक संबंधांवर थेट भाष्य केले. ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून चित्रपटांपासून तशी दूर आहे. मात्र, ती तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सोशल मीडियावरही ऐश्वर्या चांगली सक्रिय दिसते. बच्चन कुटुंबामध्ये मोठे वादळ आल्याचे कायमच सांगितले जाते. मात्र, यावर आतापर्यंत बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. त्यामध्येच आता यावर बोलताना ऐश्वर्या राय दिसलीये. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात जाताना स्पॉट झाली होती.