
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे सातत्याने चर्चेत असणारे नाव आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून तिने मोठा पैसा कमावला. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. दोघांनी काही दिवस डेट केलयानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विदेशात असताना ऐश्वर्या रायला अभिषेकने प्रपोज केला. दोघांची लव्ह स्टोरी अत्यंत खास राहिली. अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्याने दोन बड्या अभिनेत्यांना डेट केले. त्यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या सुरू आहेत.
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत लग्नापैकी एक राहिले आहे. ऐश्वर्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच ती बच्चन कुटुंबियांबद्दल बोलताना दिसली. बच्चन कुटुंबात तिला कसे वाटते आणि जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी तिला कसे वागवले. ऐश्वर्या राय हिने एबीसी न्यूजला एका मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती बच्चन कुटुंबाबद्दल अगदी स्पष्टच बोलताना दिसली.
ऐश्वर्या राय हिने म्हटले की, त्या घरात मला माझ्या घरात आल्यासारखे वाटते. ज्यावेळी मी त्यांच्या घरात प्रवेश करत होते तेव्हाच त्यांनी मला सांगितले होते की, आम्ही आमच्या मुलीचे स्वागत करत आहोत. त्यावेळी मला पालक मिळाल्यासारखे वाटले. तिथले वातावरण माझ्यासाठी अजिबात नवीन नव्हते. मी ज्या कौटुंबिक मूल्यांसह वाढले ते हेच आहेत आणि या घराचे वातावरणही तसचे मिळाले.
माझ्यासाठी अमिताभ बच्चन वडील आहेत आणि जया बच्चन आई असे सांगतानाही ऐश्वर्या राय दिसली. ऐश्वर्या राय हिने दिलेली ही मुलाखत तशी जुनीच आहे. मात्र, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरू असताना ही चर्चेत आहे. बच्चन कुटुंबाची सून झाल्यानंतरही ऐश्वर्या राय ही चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसली. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे. आराध्यासोबत कायमच स्पॉट होताना ऐश्वर्या राय दिसते.