आम्ही घटस्फोटाचा विचार… ऐश्वर्या राय हिने थेट घटस्फोटाबद्दल केले मोठे विधान, अभिषेक बच्चनही म्हणाला, भारतीय लग्न..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

आम्ही घटस्फोटाचा विचार... ऐश्वर्या राय हिने थेट घटस्फोटाबद्दल केले मोठे विधान, अभिषेक बच्चनही म्हणाला, भारतीय लग्न..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
| Updated on: Nov 02, 2025 | 8:51 AM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. मात्र, मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या राय तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करत ती बच्चन कुटुंबियांची सून झाली. त्यापूर्वी ऐश्वर्याच्या आयुष्यात मोठे वादळ आले होते, सलमान खान याच्यासोबत तिचे वाईट वळणावर ब्रेकअप झाले. सलमान खान ऐश्वर्याच्या चित्रपटांच्या सेटवर जाऊन गोंधळ घालत. ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले एक आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेत असल्याच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या. काही व्हिडीओही व्हायरल होताना दिसली.

ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे चाहत्यांना कायमच जाणून घ्यायचे असते. सतत अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. ऐश्वर्याने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटाबद्दल मोठे भाष्य केले. टीव्ही शो होस्ट ओप्रा विन्फ्रेला ऐश्वर्या हिने एक मुलाखत दिली. ज्यामध्ये ती घटस्फोटाबद्दल थेट बोलताना दिसली.

लग्न, करिअर आणि खासगी आयुष्यावर ऐश्वर्याने भाष्य केले. ऐश्वर्या राय म्हणाली की, आम्ही दोघं एकमेकांना चांगले ओळखतो. याच गोष्टींंमध्ये मी वाढते. अशाच कौटुंबिक वातावरणात मी वाढले. त्यामुळे मी खूप, खूप आरामदायी नक्कीच आहे. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन देखील उपस्थित होता. अभिषेक बच्चन म्हणाला की, भारतीय लग्न खूप मोठी असतात. कारण भारतीयांना प्रत्येक गोष्ट साजरी करायची असते. ओप्राने मजाकमध्ये म्हटले की, इतके मोठे लग्न झाल्यानंतर घटस्फोट घेणे अवघड होते, म्हणजे घटस्फोट घेता येत नाही ना…

यावर लगेचच ऐश्वर्या राय हिने उत्तर देत म्हटले की, आम्ही तो घटस्फोटाचा विचार मनात आणण्याचा प्रयत्नही अजिबात करत नाहीत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी दिलेली ही मुलाखती तशी जुनी आहे. या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय लग्नाबद्दल आणि बच्चन कुटुंबियांबद्दल बोलताना दिसली. काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ज्यामध्ये तो पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचे नाव घेताना दिसला.