
आलिया भट्ट ही बाॅलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. आलिया भट्ट सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आलिया दिसते. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही मुलगा राहा हिच्यासोबत स्पाॅट झाली. आलिया भट्ट आई सोनी राजदान हिच्यासोबतही फोटो शेअर करताना दिसते. आलिया भट्ट हिचा वाढदिवस विदेशात साजरा करण्यात आला. यावेळी आलियाची आई आणि तिची बहीण देखील होत्या. नुकताच आलिया भट्ट हिच्या आईने एक खळबळजनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टनंतर लोक हैराण झाले.
आलिया भट्टची आई सोनी राजदानने पोस्ट शेअर करत हैराण करणारा खुलासा केलाय. सोनी राजदान यांनी एका मोठ्या रॅकेटबद्दल लिहिले आहे. हेच नाही तर काही लोक त्यांना या रॅकेटमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. बरेच लोक या रॅकेटमध्ये फसल्याचेही त्यांनी म्हटले. आता आलियाच्या आईची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
सोनी राजदान यांनी म्हटले की, एक मोठे रॅकेट आपल्या आसपास सुरू आहे. मला एक फोन आला. त्यांनी मला म्हटले की, दिल्ली कस्टममधून बोलत आहे. त्यांनी म्हटले तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स मागवले आहेत. त्यानंतर त्यांनी मला आधार कार्ड क्रमांक देखील मागितला. मला तो फोन आल्यानंतर मी माझ्या आसपास चाैकशी केली की, असा फोन अजून कोणाला आलाय का?
हे लोक आपल्याला भीती घालतात, धमक्या देतात आणि आपल्याकडून बक्कळ पैसा काढतात. हेच नाही तर माझ्या ओळखींच्यापैकी एकजण या लोकांच्या म्हणण्यात आला आणि त्याने यांना मोठा पैसा देखील दिला, तो व्यक्ती आता खूप तणावात आहे. हे इतर कोणासोबतही होऊ नये, याकरिता मी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मुळात म्हणजे कोणीही या गोष्टीला नक्कीच घाबरू शकते. ज्यावेळी या लोकांनी मला आधार कार्ड क्रमांक मागितला तर मी त्यांना म्हटले की, मी थोड्यावेळाने देते. मात्र, त्यानंतर मला या लोकांचा अजूनही फोन आला नाहीये. परंतू, या अनुभव माझ्यासाठी नक्कीच भितीदायक होता. जर तुम्हाला देखील अशा नंबरवरून फोन आला तर तो नंबर अगोदर सेव्ह करून ठेवा.
अशा फोननंतर तुम्ही लगेचच पोलिसांकडे जा. मी अशा तीन लोकांना ओळखते. ज्यांना अशाप्रकारचे फोन येऊन गेले आहेत. यामुळेच तुम्ही लोक सावधान राहा आणि सुरक्षित. आता आलिया भट्ट हिच्या आईने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. लोक या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. मोठ्या रॅकेटमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आलियाच्या आईसोबत झालाय.