AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना हिंदू ना मुस्लिम, सबा आझाद हिच्याकडून धर्माबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, माझे…

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऋतिक रोशनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक रोशन आणि सबा लग्न करणार असल्याची देखील मध्यंतरी चर्चा ही रंगताना दिसली.

ना हिंदू ना मुस्लिम, सबा आझाद हिच्याकडून धर्माबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, माझे...
Saba Azad
| Updated on: Sep 24, 2024 | 6:05 PM
Share

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऋतिक रोशन हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कायमच हे दोघे विदेशात जाताना देखील दिसतात. ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अनेकांना अजिबातच आवडत नाही. ऋतिक रोशन आणि सबावर टीका देखील केली जाते. ऋतिक रोशन याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने आपल्याला काम मिळत नसल्याचे काही दिवसांपूर्वीच सबा आझाद हिने म्हटले.

ऋतिक रोशन हा मोठा अभिनेता आहे आणि त्याच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये असल्याने कोणी मला काम देत नसल्याचे थेट सबा आझाद हिने म्हटले. नुकताच आता सबा आझाद हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत. आता सबा आझाद हिच्या मुलाखतीची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

सबा आझाद हिने मुलाखतीमध्ये म्हटले की, माझ्या पासपोर्टवर सबा ग्रेवाल हे नाव आहे. माझे वडील शीख वंशाचे आहेत आणि माझी आई मुस्लिम आहे. मात्र, हे असे असले तरीही त्या दोघांनीही कधीच धर्माचे पालन केले नाही किंवा माझ्यावर त्यांचे विचार लादले नाही. पुढे सबा म्हणाली, मी नास्तिक आहे. आझाद हे माझ्या आजीचे आडनाव होते.

मला त्याचा अर्थ आवडला. म्हणूनच मी माझ्या नावासमोर आझाद लावते. हृतिक रोशन हा हिंदू धर्माचा आहे तर सबा आझाद ही मुस्लिम धर्माची असल्याचे सांगितले जाते. मात्र, पहिल्यांदाच सबा आझाद हिच्याकडून तिच्या धर्माबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. सबाने आता हे स्पष्ट केले की, तिचे खरे नाव हे सबा सिंग ग्रेवाल आहे. 

ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्यामध्ये तब्बल 12 वर्षांचे वयाचे अंतर आहे. कायमच यांच्यावर टिका देखील केली जाते. ऋतिक रोशन याच्या वाढदिवसाच्या दिवशी सबा आझाद हिने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. मध्यंतरी चर्चा होती की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद लग्न करणार आहेत. मात्र, यावर दोघांनीही काही भाष्य केले नाहीये.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता