
Bollywood Actress : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही मोजकेच असे काही कलाकार आहेत, ज्यांनी पदार्पण करताच तो चित्रपट ब्लॉकबस्टर झाला. यामध्ये काही अभिनेत्री आहेत तर काही अभिनेत्री देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला घेण्यासाठी निर्माते पैशांचे बॅग घेऊन लाईन लावायचे.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. या चित्रपटाने संपूर्ण देशाला प्रेमात पाडले होते. या चित्रपटातील गाणी, कथा जितकी लोकप्रिय झाली तितकीच लोकप्रिय झाली ती चित्रपटाची नायिका. जिचे नाव अनु अग्रवाल आहे. सावळा रंग आणि निरागस चेहरा यामुळे अनु रातोरात स्टार बनली आणि ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर अनु अग्रवालच्या आयुष्यात यशाचा अक्षरशः पूर आला. एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितले होते की ‘आशिकी’च्या यशानंतर तिच्या घराबाहेर निर्मात्यांची रांग लागायची. मात्र, यातील सुमारे 98 टक्के निर्मात्यांकडे चित्रपटाची ठोस कथा किंवा स्क्रिप्ट नसायची. कारण निर्माते फक्त पैसे घेऊन यायचे आणि चित्रपट साइन करायला सांगायचे. मी जेव्हा स्क्रिप्ट विचारायचे तेव्हा उत्तर मिळायचे कथा नंतर तयार करू आधी साइन करा. पण मी कलाकार होते; मला पैशांपेक्षा भूमिका महत्त्वाची वाटायची असं ती म्हणाली.
या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या अनुने आपल्या करिअरमध्ये ‘किंग अंकल’ आणि ‘खल-नायिका’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. मात्र, ज्या वेगाने तिचा करिअरचा ग्राफ वर गेला त्याच वेगाने नियतीने तिच्यावर कठोर आघात केला.
एका घटनेनं बदललं आयुष्य
सन 1999 मध्ये झालेल्या भीषण कार अपघाताने अनु अग्रवालचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. या अपघातानंतर ती तब्बल 29 दिवस कोमामध्ये होती. तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर इतक्या गंभीर जखमा झाल्या होत्या की तिला ओळखणेही कठीण झाले होते. अनेकांनी तिचे करिअर संपल्याचे मानले. मात्र, अनुने हार मानली नाही.
मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर तिने आपला जीवनप्रवासावर आधारित एक पुस्तक लिहिले आणि स्वतःला नव्याने शोधायला सुरुवात केली. चित्रपटांपासून दूर जात तिने योग, ध्यान आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. आज ती योगशिक्षिका आणि अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे.